गावनमुने 1 ते 21 || तलाठी कार्यालयातील गाव नमुने 1 ते २१ || गाव नमुने १ ते २१

आपल्या मिळकतीच्या बाबतीत तलाठी कार्लायाकडून आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकतो. 

या मध्ये मिळकती बाबत आपल्याला  आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत संपर्ण माहिती.

गाव नमुना  1 ते 21 नोंदवही 

जमिनीच्या मालकी व वहिवाटी संबंधी वाद निर्माण होत असतो, जमीन मालक व मिळकत घेणारा यांच्या दरम्यान या संदर्भात दावे चालू होता.

महाराष्ट्र जमीन महसूल  अधिनियम 1966 अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात.

जमीन महसूल  कायद्यान्वे जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असते.

तलाठी दप्तराचा नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुने मध्ये असतात.

या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो, कोणती माहिती कोणत्या नोंदवहीत असते, हे सामान्य नागरिकांना माहित असणे गरजेचे असते.

तर सुरु करूया कोणत्या नोंदवहीत काय माहिती असते याबाबत माहिती.

गाव नमुना नंबर – 1अ –

या नोंदवहीत भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो. मध्ये जमिनीचे गट नंबर,सर्वे नंबर दर्शवण्यात आलेले असतात, व जमिनीचा आकार बाबतीत माहिती लिहिलेले असते.

गाव नमुना नंबर – 1अ –

या नोंदवहीत वन जमिनीची माहिती मिळत असते, गावातील व वन विभाग गट कोणते हे समजते. 

गाव नमुना नंबर – 1ब –

या नोंद वहीत सरकारच्या मालकीच्या जमीन असतात.

गाव नमुना नंबर – 1क –

या नोंद वहीत कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवाटदार यांना दिलेल्या

जमिनी याबाबतची संपूर्ण माहिती लिहलेली असते. 7/12 च्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतानाखाली मिळालेल्या जमीन आहे असते ठरवता येत असते.

गाव नमुना नंबर – 1ड – 

या नोंद वहीमध्ये कुळ वहिवाट कायदा किंवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर या बाबतची माहिती लिहलेली असते.

गाव नमुना 1इ –

या नोंद वहीमध्ये गावातील जमिनीवरील अतिक्रमण व त्या बाबतची कार्यवाही संपूर्ण माहिती असते.

गाव नमुना नंबर – 2-

या नोंद वहीमध्ये गावातील सर्व बिनशेती जमिनीची माहिती दिलेली असते.

गाव नमुना नंबर – 3 –

या नोंद वहीमध्ये दुमला जमिनीची नोंद पाहायला मिळते. म्हणजेच देवस्थान साठीची जमिनी माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 4 –

या नोंद वहीमध्ये गावातील जमिनीची महसूल, वसुली विलंब शुल्क या बाबतची संपूर्ण माहिती पाहायला मिळते.

गाव नमुना नंबर – 5-

या नोंद वहीमध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदचे कर या बाबतची माहिती पाहायला मिळते.

गाव नमुना नंबर -6 –

(हक्काचे पत्रक किंवा फेरफार या नोंद वहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची

रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला त्याचा संपूर्ण माहिती असते.

गाव नमून नंबर -6अ-

या नोंद वहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी

अधिकाऱ्यांच्या निर्णय या बाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 6क – या नोंद वहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 6ड – या नोंद वहीमध्ये वारस नोंदवहीमध्ये जमिनीचे पोट हिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन

याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली असते.

गाव नमुना नंबर – 7 – या नोंद वहीमध्ये (7/12उतरा) व जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, या बाबतची माहिती पाहायला मिळते.

गाव नमुना नंबर – 7अ – या नोंद वहीमध्ये कुळ वहिवाटी बाबतची माहिती मिळते, उदाहरण :- कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड या बाबतची माहिती मिळते.

 नमुना 8 अ 

या नोंद वहीमध्ये जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती पाहायला मिळते.

गाव नमुना नंबर -8ब –

या नोंद वहीमध्ये क व ड –

या नोंद वहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल  वसुली ची माहिती मिळते. 

गाव नमुना नंबर – 9अ –

या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 10 –

या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 11 –

या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 12 व 15 –

या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 13 –

या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 14 –

या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 16 –

या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 17 –

या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 18 –

या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

गाव नमुना नंबर – 19 –

या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 20 –

पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना नंबर – 21 –

या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

तर मित्रांनो आपण जाणून घेतले आहे. तलाठी यांच्या दप्तर मध्ये असलेले गाव नमुने 1 ते 21 हे कोणत्या 

कामासाठी व त्यावर काय माहिती असते, याबद्दल सविस्तर अशी माहिती. 

 

धन्यवाद………..🙏🤝🙏🤝

 

 


गाव नमुने : 👉 1 ते 21

पोट खराब जमीन म्हणजे काय

Leave a Comment