जुने फेरफार कसे काढावे | जमिनीचे खरेदी दस्त | फेरफार कसे पहावे?, जुना 7 12 उतारा ऑनलाइन कसा मिळवू शकतो?

जुने फेरफार कसे काढावे :- आजच्या लेखामध्ये आपण शेत जमिनीशी निगडित 64 प्रकारचे कागदपत्रे जे शेतकऱ्यांच्या कोणत्याही कामासाठी उपयोगी पडू शकतात, असे 64 प्रकारचे कागदपत्रे

मोबाईल मध्ये अगदी फ्री मध्ये कसे डाउनलोड करू शकता. हेच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत, शेतकऱ्यांना कधी ना कधी कोणतेही कागदपत्राची हे आवश्यक पडते.

त्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालय असेल, तसेच भूमी अभिलेख कार्यालय असतील यामध्ये वारंवार फेर्‍या माराव्या लागतात. तर त्यासाठी शासनाने महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे.

जुने फेरफार कसे काढावे

शेतकऱ्यांना आता स्वतःच्या मोबाईल वरती जमिनीचे 64 प्रकारचे जुने कागदपत्रे, नवीन कागदपत्रे आणि डिजिटल कागदपत्रे हे अगदी सहजरीत्या मोबाईल वर उपलब्ध होणार आहे.

हे सर्व कागदपत्रे डाऊनलोड कसे करायचे आहेत ? त्याची प्रोसेस काय आहे ? शेतकऱ्यांना 1935 ते या आत्तापर्यंतचे कागदपत्रे आहेत हि कशी मिळवता येईल सविस्तर स्टेप बाय स्टेप पाहूयात.

 महाभूमी या अधिकृत या संकेतस्थळ येथे क्लिक करा 

जुने फेरफार कसे काढावे ?

पोर्टल लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मूलभूत शोध हा पर्याय दिसेल, त्याच बरोबर पुनर्विलोकन कार्ट, हिस्ट्री अशा प्रकारच्या पर्याय पाहायला मिळेल.

तुम्हाला मूलभूत शोध यावर क्लिक करायचे आहे. त्या ठिकाणी जिल्हा, तालुका, गाव, आणि त्यानंतर कोणते कागदपत्रे हवे आहे ते निवडायचं आहे.

जुने फेरफार, जुने सातबारे ऑनलाईन कसे काढावे ?

जुने खासरा पाहणी पत्रक, हक्क नोंदणी रजिस्टर, वारस नोंद, आकार बंद पत्रक, इनाम पत्रक, अश्या प्रकारचे आपण 64 प्रकारचे कागदपत्रे याठिकाणी अगदी मोफत मिळवू शकता.

त्या ठिकाणी तुम्हाला जो हवा असलेले कागदपत्रे निवड केल्यानंतर पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचे पुढे जा, या पर्याय क्लिक केल्यानंतर पुनर्विलोकन कार्ट ऑप्शन येईल.

यावर ती तुम्हाला क्लिक करायचे, आणि त्यानंतर फाईल पहा हा ऑप्शन येईल. रेड मध्ये त्यावर क्लिक करून  पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल.

अशाप्रकारे तुम्ही 64 प्रकारची डॉक्युमेंट कसे काढायचे ते आजच्या लेखामध्ये पाहिले तर मित्रांनो हा लेख आवडला असेल तर इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद. ही माहिती समजली नसेल तर खाली दिलेला व्हिडीओ पहा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *