प्रॉपर्टी कार्ड

प्रॉपर्टी कार्ड :- ३. सातबारा उतारा व 8 अ उतारा : सातबारा उतारा व 8 अ उतारा (Land Record) हा जमिनीच्या मालकी हक्क संदर्भातील महत्त्वाचा उतारा व जास्तीत जास्त उपयोगात येणारा उतारा आहे. गाव नमुना सातमध्ये संबंधित गावातील शेतकऱ्यांकडे एकूण जमीन, जमिनीवर अधिकार, इतर शेतकऱ्यांचे त्या गटातील समावेश इत्यादी माहिती दर्शविली जाते.

सातबाराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग पाहता शासनामार्फत आता सातबारे डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

प्रॉपर्टी कार्ड

4. प्रॉपर्टी कार्ड : बिगर शेतजमिनी व्यतिरिक्त तुमच्या नावावर जर इतर मालमत्ता असेल तर अशा मालमत्ता हक्क विषयीची संपूर्ण माहिती शासनामार्फत प्रॉपर्टी कार्ड यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. बिगर शेत जमिनीवर मालमत्ता हक्क विषयी महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे प्रॉपर्टी (Property Card) कार्ड होय.

ज्याप्रमाणे सातबारावरती शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती देण्यात येते, त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेत जमिनीची माहिती, जमिनीच्या मालकाची माहिती, घर, बंगला, व्यवसाय, इमारत क्षेत्र इत्यादीची माहिती देण्यात येते प्रॉपर्टी कार्डसुद्धा सातबाराप्रमाणे ऑनलाईन काढू शकता.

5. जमीन महसुलाच्या पावत्या : जमीन नावावर केल्यानंतर शेतकरी किंवा बिगर शेतजमिनीचे मालक यांना दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो. महसूल भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यामार्फत महसुलाच्या पावत्या दिल्या जातात. त्या पावत्या (Land Record Receipts) संभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी पुरावा म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करता येतो.

6. जमिनीसंदर्भातील पूर्वीच्या खटल्याची कागदपत्र : एखादी जमीन तुम्ही खरेदी केल्यानंतर, त्यासंदर्भातील वाद उद्भवले असतील किंवा त्या जमिनीबाबत पूर्वी कोणत्याही प्रकारचा खटला किंवा केस चाललेला असेल, तर अशा खटल्या संदर्भातील संपूर्ण कागदपत्रे त्याबद्दलच्या जबाब, निकालपत्र इत्यादी कागदपत्र जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे; कारण ही कागदपत्रे मालकी हक्क बजावण्यासाठी भविष्य काळामध्ये खूपच महत्त्वाची ठरतात.

येथे पहा व्हिडीओ जाणून घ्या कायदा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !