50 Hajar Protshan GR | 50 हजार प्रोत्साहन करिता ऑनलाईन करावे लागणार पहा जीआर तुम्ही पात्र कि अपात्र ?

50 Hajar Protshan GR

50 Hajar Protshan GR :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये काही निकष, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तरी यामध्ये आपण पात्र आहात ? की अपात्र हे जाणून घेऊया. योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याचा शासन निर्णय व इतर सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर नक्की करा.

50 Hajar Protshan GR

सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. १) कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. शासन निर्णय क्रमांकः प्रोअयो ०६२२ / प्र.क्र. ७२ / २-स २) या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले
अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.

50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण ? 

३) सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील. सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत – १) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. २) महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.

50 हजार प्रोत्साहन अपात्र शेतकरी  

३) केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी ( एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) ४) राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) ५) शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

50 Hajar Protshan GR

हेही वाचा; या बँकेची सरसकट होणार कर्जमाफी पहा पात्र शेतकरी ? 

शेतकरी कर्जमाफी योजना 

६) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५००० पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).७) कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

50 Hajar Protshan GR

येथे डाउनलोड करा शासन निर्णय येथे क्लिक करा 


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top