Aadhar Card Correction Online | मोबाईल नंबर लिंक नसेल तरी करा आधार कार्ड वरील दुरुस्ती पहा या 4 सोप्या स्टेप्स

Aadhar Card Correction Online

Aadhar Card Correction Online :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. अधिकृत मोबाईल क्रमांक आपला नाही तरी आधार कार्ड मध्ये आपण दुरुस्ती करू शकता. हेच अपडेट आपण आज लेखांमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर अशा चार स्टेप्स आहेत ज्या आपल्याला फॉलो करून आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ह्या दुरुस्ती कोणत्या आहेत ?, कोणत्या स्टेप्स आहेत ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे, तर लेख सुरू करूया.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Aadhar Card Correction Online

आपला अधिकृत मोबाईल नंबर नसला तरी आपण आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकतात. तर स्टेप्स काय आहेत ?, पुढील प्रमाणे आपण पाहूया. आधार कार्ड जे आहे ते युआयडीकडून जाहीर करतात. यालाच आपण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण मराठी मध्ये म्हणतो. तसेच भारत सरकारची अधिकृत एजन्सी आहे. यामध्ये आपल्याला बारा अंकी चा विशिष्ट कोड दिलेला असतो. तर हे आपल्या सर्वांना माहीतच असणार आहे. तर आता या ठिकाणी कोणते बदल आपल्याला आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर नसला तरी करता येणार आहे. हे या ठिकाणी खालील स्टेप्स फॉलो करून आपण करू शकता.

आधार कार्ड त्रुटीची दुरुस्ती कशी करायची ?

कार्ड त्रुटीची दुरुस्ती कशी करता येईल. आपल्या आधार कार्ड मध्ये आपला आधार कार्ड तयार करताना किंवा छापण्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक होते. या कारणांनी आपल्याला पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागते. किंवा जन्मतारीख असेल किंवा आडनाव, नाव, यामधील काही दुरुस्ती करणे असेल, तर आपण आधार केंद्रावर जाऊन करू शकता. किंवा ऑनलाईन द्वारे देखील या ठिकाणी कामे करता येतात. परंतु ते दुरुस्ती करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर लिंक जर नसेल तर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने आधार केंद्र या ठिकाणी मोबाईल नंबर नोंदवून मग ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करावी लागते.

आधार मध्ये करा बदल

UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केल्यावरच त्यात बदल करता येईल. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवला नसेल, तर तो आधी नोंदवा. त्यासाठी अर्ज करा. 3-5 दिवसांत मोबाईल क्रमांक नोंदवला जातो. या मोबाईल क्रमांकावर OTP मिळतो. ज्याच्या मदतीने आधारमध्ये बदल करता येतो, अथवा ते अद्ययावत करता येते. तुम्ही ऑनलाइन सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल म्हणजेच SSUP ची मदत घेऊन आधारमध्ये जन्मतारीख दुरुस्त करू शकता. यासाठी देखील OTP पडताळणी आवश्यक आहे. पण त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला आधार केंद्रावरच जावे लागेल.

या स्टेप्स करा फॉलो
 • घराजवळील कोणत्याही आधार केंद्राला भेट द्या आणि आधार कार्ड दुरुस्ती फॉर्म घ्या
 • फॉर्म भरा आणि आधार कार्डची प्रत आणि पॅनकार्ड यांची सत्यप्रत जोडा
 • आधार केंद्रावर बायोमेट्रिक मशीनद्वारे तुमच्या अंगठ्याचा ठसा, रेटिना स्कॅन करा
 • आधार केंद्राचा ऑपरेटर तुम्हाला पोचपावती देईल
 • तुमचा मोबाईल क्रमांक 2-5 दिवसांत आधारशी लिंक केला जाईल
यांची दुरुस्ती ऑफलाईन करा
 1. नाव
 2. पत्ता
 3. जन्मतारीख
 4. लिंग
 5. मोबाईल नंबर
 6. ई -मेल आयडी

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top