Aapli Chawdi Mahiti in Marathi | Aapli Chawdi Ferfar | आपली चावडी ई फेरफार

Aapli Chawdi Mahiti in Marathi : नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांनो दिवसंदिवस शेती ही आधुनिक होत चालली आहे. आणि आधुनिक होत असताना शेतकरी किंवा नवयुवक हे आता शेतीकडे वळत आहे.

शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. शेतीतून अनेक प्रयोग करून कोट्यवधी रुपये शेतकरी कमवत आहेत. यामध्येच आता शेतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

आज या लेखाच्या माध्यमातून गावातील किंवा जिल्ह्यातील, राज्यातील जमिनीचे व्यवहार, मालमत्ता व्यवहार, मोजणी विषयी आपल्या गावातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील कोणी जमीन खरेदी केली ? कोणी विकली ?

या संबंधीतील सविस्तर प्रक्रिया ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पाहता येते. यासाठी शासनाने नवीन पोर्टल विकसित केले आहे. तुम्हाला या माध्यमातून तुमच्या गावात कोणी जमीन विकली, कोणी खरेदी केली हे तुमच्या मोबाईलवरून तत्काळ पाहता येणार आहे.

Aapli Chawdi Mahiti in Marathi

यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. शासनाच्या माध्यमातून आपली चावडी पोर्टल हे शासनाने सुरू केला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतजमिनीचे खरेदी-विक्री,

परिसरातील चालू घडामोडी, बाबत सर्वसामान्य तपशील प्रदान करते. या पोर्टलचे वैशिष्ट्य जर पाहिले गेले तर सातबारा उतारा, जमिनीचा व्यवहार नोंदवला की व्यवहाराशी संबंधित माहिती चावडी ही फेरफार मिळते.

आपली चावडी पोर्टल वर खरेदी विक्रीची व्यवहार, खरेदी, बोजा, हक्क सोड पत्र, रिलीज डीड हे कसे पहावेत याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

आपली चावडी ई फेरफार

आपली चावडी पोर्टलवर Aapli Chawdi Portal सर्व माहिती प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसामध्ये तुम्ही आक्षेप नोंदवू शकतात.

म्हणजे जर तुमच्या गावांमध्ये कोणी जमीन खरेदी केली असेल किंवा विक्री केली असेल आणि त्यावर तुम्हाला आक्षेप असेल तर त्याची तुम्ही नोंदवू शकतात.

ही माहिती सर्वसामान्यांना अगोदर सूचित केले जाईल, आणि भविष्यात कोणतेही वादविवाद जास्त प्रमाणात वाढू नये याची खात्री करण्यासाठी हे पोर्टल शासनाने सुरू केला आहे.

📑 हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो तुमच्याकडे शेतजमीन आहेत, पण हे 7 कागदपत्रे तुमच्या नावावर असेल तरच तुम्ही मालक, आताच पटापट चेक करा तुमच्या नावावर आहेत का ?

आपली चावडी पोर्टलवर कसे खरेदी विक्रीचे व्यवहार पहावे ?

Aapli Chawdi Mahiti in Marathi
  • सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर किंवा कोणतेही ब्राउझर ओपन करायचा आहे.
  • हे ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला आपली चावडी पोर्टल ही साईट दिसेल
  • अधिकृत संकेतस्थळ लिंक https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi देण्यात आलेली आहेत.
  • आपली चावडी साईट ओपन झाल्यानंतर सातबारा विषयी, मालमत्ता पत्रक विषयी, आणि मोजणी विषय असे 3 पर्याय तुम्हाला दिसून येतात.
  • त्यानंतर तुम्ही राहत असलेला जिल्हा, तालुका, गावाची सलेक्ट करून घ्या. त्यानंतर एक कॅप्टचा कोड दिलेला असतो, तो चौकोनी रकान्यामध्ये टाकावा.
  • आपली चावडी पहा या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर गावातील जमिनीच्या संदर्भातील चालू व्यवहार, चालू फेरफार (Aapli Chawdi Ferfar) यांची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते.
Aapli Chawdi Mahiti in Marathi

आपली चावडी पोर्टल

यातच सर्वात महत्त्वाचं शासनाने आपली चावडी पोर्टल हे सातबारा विषयी माहिती तसेच मालमत्ता पत्रक विषयी माहिती आणि मोजणी विषयीचे जे काही माहिती आणि कोणी फेरफार केलाय कोणी नोंद केली आहे कोणा विक्री खरेदी केली आहे जमिनीची ही संपूर्ण माहिती आपली चावडी

या डिजिटल नोटीस बोर्ड वर शेतकरी बांधवांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या आपली चावडी वरून जमिनीची खरेदी व्यवहार, किंवा जमीन विक्रीचे व्यवहार आपली चावडीवरून कसे पाहावे लागतात

ही माहिती आज आपण लेखाच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती स्क्रीन शॉट मध्येच पाहायला मिळणार आहे, तसे तुम्ही त्या पद्धतीने हे आपली चावडीवरून पाहू शकता आणि डाउनलोड देखील करू शकतात. अशाच माहिती करिता वेबसाईट ला भेट देत रहा धन्यवाद…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *