Adrak Lagwad Mahiti Marathi | आले लागवड कशी करावी | अद्रक लागवड कशी व कधी व खत, पाणी व्यवस्थापन जाणून घ्या सविस्तर माहिती !

Adrak Lagwad Mahiti Marathi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी. आजच्या लेखामध्ये आले लागवड म्हणजेच आद्रक लागवड कशी करावी.

याची संपूर्ण व्यवस्थापन तसेच कीड नियंत्रण असेल रोग नियंत्रण अद्रक लागवड सुधारित जाती असतील. अद्रक हंगाम कोणता निवडावा लागवड कोणत्या महिन्यात कशी करावी. आले अद्रक लागवड बीज प्रक्रिया कशी असावी.

अद्रक खत व्यवस्थापन कसे असावे. आले लागवड पाणी व्यवस्थापन कसे असावे. म्हणजेच योग्य प्रक्रिया कशी असावी कीड-रोग नियंत्रण कसे असावे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत यासाठी लेख संपूर्ण वाचा.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Adrak Lagwad Mahiti Marathi

अद्रक लागवड हवामान कसे असावे :- आल्याची व्यापारीदृष्ट्या लागवड उष्ण आणि समशीतोष्ण हवामानातील भागामध्ये यशस्वी होते. उत्तम वाढीकरिता प्रमुख्याने उष्ण आणि कोरडे, तसेच दमट हवामान चांगले मानवते.

महाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील 30 ते 35 सें.ग्रे. तापमान आल्याच्या गड्ड्याच्या उगवणीसाठी अनुकूल असावे लागते. नैसर्गिक साधारण वाढ होण्यास 20 ते 30 सें. ग्रे. तापमान अनुकूल असावे लागते.

तापमान 35 सें. ग्रे. च्यावर गेल्यास पाने होरपळतात आणि पानांचा रंग बदलतो. गड्ड्यांची चांगली उगवण होण्यासाठी गड्ड्यांच्या सभोवतालचे मातीचेतापमान 25 ते 26 सें. ग्रे. असणे आवश्यक आसते.

तसेच दिवसाचा काळ 10 तासांपासून 16 तासांपर्यंत वाढल्यास शाखीय वाढ जोमाने होते परंतु गड्ड्यांमधील सुवास कमी होतो. समुद्रसपाटीपासून 300 ते 900 मी. उंचीपर्यंत

आल्याची लागवड यशस्वी होते. एप्रिल महिन्यात लागवड केल्यास शाखीय वाढ समाधानकारक होऊन गड्ड्यांची चांगली वाढ होते व जास्त उत्पादन मिळते.

आले लागवड जमीन कशी असावी 

आले पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचर्‍याची सेंद्रिययुक्त तांबडी जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीतसुद्धा आले पीक येऊ शकते. परंतु अशा प्रकारच्या जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी

भरपूर प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्टकिंवा गांडूळखत घालणे आवश्यक आहे. जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक 6.0 ते 6.5 पर्यंत असल्यास झाडांची चांगली होऊन जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते.

अद्रक लागवड सुधारित जाती

आले प्रामुख्याने ज्या भागात पिकविले जाते त्यावरून जातीच्या नावाचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्र राज्यात सध्या ‘माहीम’ या स्थानिक नावाने ओळखले जाणारे आले लावणीसाठी वापरणे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे.

या जातीमध्ये ‘मोक्या’ आणि ‘अंगर्‍या’ असे दोन प्रकार पडतात. ‘मोक्या’ हा रसरशीत आणि ठोसर असतो. त्यामुळे बियाणांत हा प्रकार चांगला समजला जातो.

याशिवाय अखिल भारतीय स्तरावर सुधारित वाण म्हणून रिओ-डी-जानेरो, चायना मशन, सिंगापुरी, नडिया हे सुधारित तंतुविरहित वाण लागवडीस योग्य आहेत. निरनिराळ्या राज्यांत खालील आले जातींची लागवड प्रचलित आहे.

🧾 हे पण वाचा :- घरकुल योजनेची यादी pdf डाउनलोड करा पहा तुमचे नाव आले का ? ही नवीन पद्धत आली !

अद्रक लागवड लागवडीचा हंगाम 

आले लागवड कधी करावी :- राज्यात आल्याची लागवड प्रामुख्याने एप्रिलपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत केली जाते. साधारणपणे जानेवारी -फेब्रुवारीमध्ये

काढलेले बियाणे नवीन लागवडीस वापरावे. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बियाणास मुळ्या फुटून पीक स्थिर होते आणि जास्त प्रमाणात उत्पादन मिळते.

आले लागवड कशी करावी

पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये शेतकरी आल्याची लागवड सपाट वाफा किंवा रुंद वरंबा पद्धतीने करीत असतात. रूंद वरंबा पद्धतीमध्ये पाया 1.5 मीटर (4.5 फूट) व माथा 90 सें.मी. ते 1.0 मीटर रुंद ठेवतात.

सपाट वाफ्यामध्ये लागवड करताना 3 मी. × 2 मी. किंवा 3 मी. ु 1 मी. वाफ्यात आल्याची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 22.5 सें. मी. आणि दोन बियाणे कंदामधील अंतर 15 सें. मी. ते 22.5 सें. मी. ठेवतात.

कंद लावताना फुटलेले डोळे जमिनीच्या वरच्या बाजूस येतील याची दक्षता घ्यावी लागते.सुधारित लागवड तंत्रज्ञानाप्रमाणे आल्याच्या कंदाची लागवड गादीवाफ्यावर करण्याची शिफारस करीत आहे.

एकसारख्या आकाराच्या उत्तम गड्ड्यांचे उत्पादन आणि पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा जास्त उत्पादन व प्रत मिळते. आल्याची गादीवाफ्यावर लागवड केल्यानंतर पिकास पाणी देण्यासाठी ठिबक संच वापरणे अत्यावश्यक आहे.

अद्रक लागवड कधी व कशी करावी 

त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार दररोजच्या बाष्पीभवनावर आधारित ठिबकमधून मोजकेच म्हणजे पिकाला जवेढी पाण्याची गरज आहे तेवढेच पाणी उपलब्ध करता येते.

शिवाय पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकास खतांच्या मात्रा विद्राव्य खते वापरून उपलब्ध करून देता येतात. यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन गड्ड्यांची वाढसुद्धा चांगली होऊन उत्पादन वाढते.

जादा उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीच्या गड्ड्यांसाठी आले पिकाची लागवड पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करून गादीवाफ्यांवर करून ठिबक सिंचन पद्धत पाणी आणि खतांच्या मात्रा देण्यासाठी वापरावी.

अद्रक लागवड

जमिनीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर गादीवाफे 60 सें. मी. रुंद व 30 सें. मी. उंच व सोयीप्रमाणे लांबीचे ठेवून तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये 30 सें. मी. अंतर ठेवावे.

प्रत्येक गादीवाफ्यावर दोन ओळींत 40 सें. मी. अंतर ठेवून दोन बियाणे कंदांमधील अंतर 20 सें. मी. ठेवून लागवड पूर्ण करावी. अशा पद्धतीने लागवड केल्यास एकरी 44,400 कंद बेण्यांची लागवड होते.

आले लागवड संपूर्ण माहिती

प्रत्येकी 20 मीटर लांबीच्या गादीवाफ्यावर प्रत्येक ओळीत 900 कंदांची लागवड याप्रमाणे दोन ओळींत 200 कंद बेण्यांची लागवड होते. एकूण एकरी 222 गादीवाफे तयार होतात.

आल्याची बेणे निवड: आले लागवड करताना उत्पादनाच्या दृष्टीने बेण्याची निवड, बेणेप्रक्रिया आणि लागवड पद्धत याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.आले लागवड करताना कीड व रोगग्रस्त बेणे लागवडीस वापरू नये.

लागवडीसाठी 3 ते 5 सें. मी. लांबीचे, 30 ते 35 ग्रॅम वजनाचे तुकडे काळजीपूर्वक निवडावेत. ते चांगले रसरशीत जून, 1 ते 2 डोळे फुगलेले असावेत. साधारण साठवणीतून काढलेले फुगलेल्या डोळ्यांचे 10 ते 12 क्विंटल बेणे

एक एकर लागवडीसाठी पुरेसे होते. त्यासाठी शेतातून काढलेले सुमारे 10 क्विंटल बेणे दीड ते दोन महिने साठवणीत ठेवावे लागते आणि त्यामध्ये साठवणीच्या वजनात 30 ते 35 टक्के घट येते.

आले (अद्रक) बीजप्रक्रिया कशी करावी 

कंदमाशी आणि कंदकुज रोग होऊ नये म्हणून बेण्यास खालीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी 20 मि.ली. इकॅलक्स 35 टक्के + 15 ग्रॅम बाविस्टीन 10 लिटर पाण्यात मिसळावे.15 मि.ली. मॅलॅथिऑन + 25 ग्रॅम डायथेन

एम-45 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे.वरील 10 लिटरचे द्रावण 100 ते 120 किलो बेण्यास पुरेसे होते. बेणे द्रावणामध्ये 30 मिनिटे बुडवून त्याची दक्षता घ्यावी.

एक एकर 6 ते 7 क्विंटल बेण्यास 60 ते 80 लिटर द्रावण पुरेसे होते. बेणे द्रावणामधून काढून सावलीत सुकविल्यानंतर लागवडीस. बेणे 4 ते 5 सेंमी खोल गादीवाफ्यावर लावावे व मातीने झाकून घ्यावे.

आले अद्रक खत व्यवस्थापन

पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी आले पिकास एकरी 48 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश जमिनीच्या मगदुराप्रमाणे देण्याची आवश्यकता आहे. वरील खतांच्या मात्रा खालीलप्रमाणे घ्याव्यात.

आले लागवड खत व्यवस्थापन / खत एकरी

लागवडीपूर्वी सुफला 15:15:15……….. 100 किलो., शेणखत – 15 मे.टन, जमिनीत मिसळून सिंगल सुपर फॉस्फेट 94 किलो.  नीमपावडर -1.5 मे.टन लागवडीनंतर उज्वला युरिया 43 किलो.

40 दिवसांनी लागवडीनंतर उज्वला युरिया 28 किलो. 60-70 दिवसांनी म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो गादीवाफ्यावर लागवड केलेल्या आले पिकास ठिबक संचद्वारा खतांच्या मात्रा.

विद्राव्य खते वापरून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खालीलप्रमाणे देण्याची शिफारस केली आहे. (नत्र 50 किलो, स्फुरद 30 किलो, पालाश 30 किलो प्रति एकर) पिकाच्या वाढीची

अवस्था खते देण्याचे दिवस विद्राव्य  खतांचे शेकडा प्रमाण नत्र: स्फुरद: पालाश खते कि./ दिन/ एकर एकूणखते कि./एकर एकूण खतांच्या मात्रा

नत्र : स्फुरद : पालाश लागवडीपासून ते 45 दिवस – गड्ड्यांची उगवण व शाखीय वाढ 45 सुजला 12:61:0 उज्वला 46:0:0, युरिया सुजला 0:0:50 0.547 0.340 0.670 24.60 15.30 30.00 2.95:15.00:00.00

7.05:0.00:0.00 0.00:0.00:15.00 लावगडी पासून 46 ते 90 दिवस कदास फुटवे फुटणे व पानांची वाढ 45 सुजला 12:61:0. उज्वला युरिया 46:0:0, 0.365, 0.110 16.40 50.00 2.00:10.00:0.00


लागवडीपासून 91 ते 130 दिवस कंद पोसण्याची अवस्था 40 सुजला 19:19:19, उज्वला युरिया 46:0:0, सुजला 0:0:50 0.658 0.270 0.250 26.320 10.90 10.00 5.00:5.00:5.00 0.00:0.00:5.00 लागवडीपासून

131 ते 250 दिवस कंदाची वाढ, कंद पक्व होण्याची अवस्था 120 उज्वला 46:0:0, युरिया, सुजला 0:0:50 0.090, 0.167 10.90, 20.00 5.00:5.00:5.00, माती परीक्षण अहवाल लागवडीपूर्वी उपलब्ध करावा. 50.0:30.0:30.00.

आले लागवड माइक्रोलाचा वापर

दर्जेदार उत्पादन, अधिक मूल्य, पिकाची निरोगी वाढ, उत्पादनाचा आकार, वजन, प्रत यात वाढीसाठी आले पिकावर माइक्रोला. या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची फवारणी करणे आवश्यक आहे.

यासाठी माइक्रोल प्रति लिटर 3 मि ली. पाण्यात मिसळून पहिली फवारणी लागवडीपासून 30 दिवसांनी करावी. त्याचप्रमाणे दुसरी आणि तिसरी फवारणी माइक्रोल प्रति लिटर 4 मि ली.

पाण्यात मिसळून लागवडीपासून 60 दिवसांनी आणि 90 दिवसांनी करावी.माइक़्रोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत हे आर .सी.एफ. च्या अधिकृत खतविक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असते.

आले लागवड पाणी व्यवस्थापन

साधारणपणे 250 ते 300 मि.मी. पाऊस पडणार्‍या भागामध्ये आल्याचे पीक चांगले येते. आल्याच्या बियाणे कंदाची लागवड शक्यतो प्रथम क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर करावी.

लागवडीनंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यानंतर 6 त 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रत्येक वेळी पिकास हलके पाणी द्यावे. पारंपरिक लागवडीच्या पद्धतीमध्ये पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचू देऊ नये.

पाण्याची कमतरता असणार्‍या भागात स्प्रिंकलर अथवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना प्रथम पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार दररोजचे बाष्पीभवन विचारात घेऊन.

पिकाची दररोजची पाण्याची गरज निश्‍चित करावी व तेवढेच पाणी मोजून द्यावे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पाण्याबरोबरच विद्राव्य खते वापरून खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारा द्याव्यात.

आले खुरपणी प्रकिया 

लागवड क्षेत्रात सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमिनीतील पाणी साठविण्याची क्षमता वाढते, तसेच जास्त पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.

बेण्याची लागवड झाल्यानंतर वाफ्यांवर हिरव्या पानांचे 8 ते 10 इंच उंचीचे आच्छादन करावे. साधारणतः तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकामध्ये 2 ते 3 वेळा खुरपणी करावी. आच्छादन दोन वेळा करावे. पहिले आच्छादन लागवड पूर्ण झाल्यावर

हिरव्या पानांचे (ग्लिरिसिडिया पानांचे) अंदाजे एकरी 5 टन, तर दुसर्‍या वेळेस आच्छादन लागवडीपासून 40 दिवसांनी अंदाजे एकरी 2 मे. टन हिरवी पाने वापरून करावे. पिकाच्या क्षेत्रातील तणांचे नियंत्रण आच्छादन केल्याने कमी होते.

आले (अद्रक) कीड, रोग आणि नियंत्रण

आले पिकावरील महत्त्वाची कीड व रोग आणि नियंत्रण खालील प्रमाणे: (अ)कीड खोडमाशी (शूट बोअरर): झाडाच्या मध्य खोडावरील पाने पिवळी पडून सुकल्यासारखी दिसतात. खोडमाशी खोडाला छिद्र पाडून आतील गरावर जगते.

नियंत्रण: मॅलॅथिऑन 10 मि ली. किंवा मोनोक्रोटोफॉस 10 मि ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून जुलै ते ऑक्टोबर महिन्यात 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 4-5 फवारण्या कराव्यात.

कंदमाशी (रायझोम स्केल) : कीड असलेल्या झाडांतील अन्नरस शोषून घेतल्याने पुढे जमिनीतील कंदांची वाढ थांबून सुरकतल्यासारखे होतात व नरम होतात. लागवडीस असे कंद वापरल्यास उगवण अतिशय कमी होते.

प्रादुर्भाव झालेले कंद (गड्डे) निवडून नष्ट करावेत. साठवणुकीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी गड्डे क्विनॉलफॉस 10 मि ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून बुडवून घ्यावेत.

अद्रक लागवड रोग व्यवस्थापण 

नरम कुज (रायझोन रॉट/सॉफ्ट): जमिनीतील पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंड्याकडून झाड वाळत येते. बुंध्याचा भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो.

यानंतर जमिनीतील गड्डे सडण्यास सुरुवात होते. नियंत्रण पाण्याचा योग्य निचरा होणार्‍या जमिनीत लागवड अत्यावश्यक आल्याची लागवड शक्यतो गादीवाफ्यावर करून ठिबकद्वारे पाणी द्यावे.

निरोगी बेण्याची लागवडीसाठी निवड करावी. डायथेन एम-45, बुरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा रोडोमिल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून बियाणे (गड्डे) या द्रावणात 30 मिनिटे बुडवून व सावलीत सुकवून नंतर ते लागवडीस वापरावे.

तसेच लागवडीपूर्वी निंबोळी पेंड चुरा (नीम केक पावडर)0.8 मे. टन प्रति एकर जमिनीत मिसळून द्यावी. प्रादुर्भाव झालेली झाडे व गड्डे काढून नष्ट करावेत.

लागवडीपूर्वी क्षेत्र एप्रिल महिन्यात पॉलिथिन पेपरने 30 दिवस झाकून निर्जंतुक करावे. जुलै ते ऑक्टोबर प्रत्येक महिन्यात 5ः5ः50 टक्क बोर्डोमिश्रणाने वाफ्यावर ड्रेंचिंग करावे.

अद्रक (आले) काळे ठिपके (लीफ स्पॉट) 

पाणीयुक्त गोलाकार ठिपके पानांवर, खोडावर दिसून येतात. कालांतराने हे ठिपके गडद ब्राऊन रंगाचे होतात. व मध्यभागी पिवळ्या रंगाचे असतात. पुढे हे ठिपके एकमेकांत मिसळून झाडाची पाने जळाल्यासारखी दिसतात.

रोगाचा प्रादुर्भाव पानांवर झाल्यामुळे उत्पादनात अतिशय घट होते. आले रोग नियंत्रण कसे करावे :- झाडावर /खोडावर रोगाचे ठिपके आढळून आल्यावर पिकावर

डायथेन एम-45 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन. किंवा 1 टक्का बोर्डो मिश्रण दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने जरुरीप्रमाणे फवारणी करावी.

Leave a Comment