Agarbatti Vyavsay Kasa Karava :- आज या लेखात अतिशय महत्त्वाच्या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही व्यावसाय करत असाल किंवा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा आर्टिकल तुम्हाला संपूर्ण वाचायचा आहे.
कारण या लेखात अतिशय महत्त्वाच्या व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत. हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा व्यवसाय असून या व्यवसायाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याची कमाई ही तुम्हाला चांगली होणार आहे. आणि कमी गुंतवणुकीत तुम्हाला जास्त नफा यातून मिळवता येतो. आता या व्यवसायाची माहिती आपण पाहूयात.
Agarbatti Vyavsay Kasa Karava
प्रत्येकाला जास्त पैसे हे कमवायचे असतात, तर आता पैसे कमवायचे असेल तर तसा व्यवसाय ही तुमचा पाहिजे. आणि कमी बजेटमध्ये चांगला व्यवसाय शोधत असाल तर तुमच्यासाठी अगरबत्ती व्यवसाय सर्वात चांगला आहेत. आज अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करावा ? संपूर्ण माहिती ही आज जाणून घेणार आहोत.
स्वतःचा व्यवसाय करून तुम्ही तुमचा प्रॉडक्टचा ब्रँड बनवू शकता. अगरबत्तीचा व्यवसाय 100 रुपयांमध्ये देखील सुरू करता येतो. तुम्ही गावात किंवा लहान शहरात राहत असाल तरी तुम्ही अगरबत्ती व्यवसाय सुरू करू शकता. मोदी सरकार सर्वांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.
अगरबत्ती व्यवसाय विषयी माहिती
आता यामध्ये खादी आणि ग्राम उद्योग आयोगाने देशाला अगरबत्ती उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी प्रस्तावित केलेल्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाला आता मान्यता मिळाली आहे. आता अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू कसा करावा ? हे आज या ठिकाणी पाहणार आहोत.
सर्वप्रथम मिक्सर मशीन, ड्रायर मशीन, आणि मुख्य उत्पादन मशीन याचा यामध्ये समावेश आहे. भारतात अगरबत्ती बनवण्याचे मशीनची किंमत जवळपास 35 हजार ते 1 लाख 75 हजार रुपये पर्यंत आहे. या मशीन मधून 1 मिनिटात 150 ते 200 हजार अगरबत्ती बनवता येते. तुम्ही हाताने अगरबत्ती बनवली तर तुम्ही 15 हजार रुपये पेक्षा कमी किमती पासून सुरुवात करू शकतात.
📒 हेही वाचा :- ईपीएफ पासबुक मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे ? | पीएफ पासबुक डाउनलोड कसे करावे मोबाईलमधून 1 मिनिटांत Pdf !
अगरबत्ती व्यवसाय कच्चामाल ?
अगरबत्ती बनवण्यासाठी साहित्य गम पावडर, चारकोल पावडर, बांबू, नार्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या, चंदनाचे लाकूड, जेनेली पेपर, शॉर्ट पॅकिंग साहित्य, कच्चा मालाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही बाजारातील चांगल्या पुरवठा दरांशी संपर्क करून खरेदी करू शकता. अगरबत्ती कच्या मालाचा पुरवठा मशीनची स्थापना नंतर
कच्चामाल पुरवण्यासाठी बाजारातील जे काही पुरवठादार आहे यांच्याशी संपर्क साधून तिथून तुम्हाला कच्चामाल खरेदी करायचा आहे. अगरबत्ती उद्योगात आधीपासून व्यवसाय करत असलेल्या लोकांची मदत तुम्ही घेऊ शकता. कच्चामाल नेहमी आवश्यत्यापेक्षा थोडा जास्त खरेदी केला पाहिजे, कारण त्यातील काही भाग हा वाया जातो.
आकर्षित डिझाईन पॅकिंग करा
तुम्हाला व्यवसाय करायचे असेल तर तुमची उत्पादन आकर्षक डिझाईन पॅकिंग वर विकले जाते, याकडे लक्ष द्यावे लागते. पॅकिंगसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. तुमची पॅकिंग आकर्षक बनवा पॅकेजिंग वरून लोकांचे धार्मिक भावनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
जेणेकरून तुमचे जे ब्रँड आहे हा लवकरच लवकर तयार होईल. आणि वर्तमानपत्रात, टीव्हीवर जाहिराती द्याव्या. आणि याशिवाय जर तुमचे बजेट चांगले असेल तर कंपनीची ऑनलाइन वेबसाईट देखील तुम्ही तयार करू शकता. अगरबत्ती बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणं तुम्हाला गरजेचे आहे ? हे देखील खूपच महत्वाचा आहे.
📒 हेही वाचा :- हा व्यावसाय कराल तर कमवाल लाखों रुपये, अन कधीही न बंद पडणारा हा व्यवसाय, वाचा कमाई करून देणाऱ्या व्यवसाय बद्दल माहिती व सुरु करा लगेच
Agarbatti Vyavsay Kasa Karava in Marathi
अगरबत्ती कधीही उन्हात वाळवू नका नेहमी सावलीत वाळवा. किंवा सुकवणाऱ्या यंत्राचा वापर करा. अगरबत्ती कोरडी करण्यासाठी बाजूला ठेवा असं न केल्यास ओली राहिल्याने ते चिकटण्याची शक्यता असते. तुम्हाला सुगंधी अगरबत्ती बनवायचे असेल तर सुकल्यानंतर त्या अगरबत्ती एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधी पदार्थात बुडवल्या जाव्यात.
अशा प्रकारे तुम्हाला अगरबत्ती व्यवसाय करता येतो. आता तुम्हाला अगरबत्ती व्यवसाय नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. जो तुम्ही व्यवसाय करत आहात हा वाढल्यानंतर त्याची नोंदणी ही ऑनलाईन करू शकता. जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचणी येणार नाही.
आणि व्यवसायासाठी SSI युनिटमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अगरबत्तीचा व्यवसाय करून जोरदार कमाई करू शकता. तर अशा प्रकारचे हे सर्वात महत्त्वाचं अगरबत्ती व्यवसाय आहे. आधिक व्यवसाय बद्दल माहितीकरिता आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा धन्यवाद…
📒 हेही वाचा :- पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता 50% टक्यावर 50 लाखापर्यंत कर्ज कसं घ्याल ? पहा केंद्राची ही योजना सुरू त्वरित ऑनलाईन फ्रॉम भरा !