Agriculture Water Pump Marathi :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांनो शेती करत असताना विविध अडचणीचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो. आणि वेळेवर पाऊस पडला नसेल तर पिकांना पाणी देण्यासाठी विविध
अडचणी जसे लाईट, मोटर करा होणे, किंवा लाईट कमी असल्यामुळे मोटर पाणी मारत नाही. किंवा मोटर खराब होतो, अशा विविध अडचणींचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो. तर आज सर्व बाबी या संदर्भातील जाणून घेणार आहोत.
आता हा पंप बसवल्यानंतर कितीही खोलीवरून शेतात पाणी पोहोचता येणार आहेत. यासाठीच हा मोटर पंपाची माहिती आज जाणून घेऊया. पाणबुडी पंप नेमकी काय आहे ? तर याबाबत अधिक माहिती समजून घेऊया.
सिंगल स्टेज सबमर्सिबल मोटर
हा पंप पहिल्या टप्प्यांमध्ये काम करणारा असून एका मोटरीच्या माध्यमातून ऑपरेट केला जातो. जर तुम्हाला लहान नदी किंवा ओढ्याचे पाणी शेतामध्ये पोहोचायचे असेल सिंगल स्टेज सबमर्सिबल पंप तुमच्या उपयोगी पडू शकतो.
मल्टी स्टेज सबमर्सिबल पंप माहिती मराठी
सबमर्सिबल पंपाचे प्रकार आहे तो एकापेक्षा जास्त टप्प्यात काम करतो. जसे की हाय प्रेशर ने पाणी उंच असलेल्या ठिकाणावर न्यायचे असेल तर हा पंप फायद्याचा ठरतो. आणि एखाद्या तलावामधून किंवा कालव्यातून उंच ठिकाण वर पाणी द्यायचे असेल किंवा पोहोचवायचे असेल तर तुमच्यासाठी हा मल्टीस्टेट सबमर्सिबल मोटर पंप फायद्याचा राहतो.
📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !
वर्टीकल सबमर्सिबल पंप माहिती :- साधारणतः विहिरीमध्ये किंवा शेताच्या काठावर पंप बसून पाणी हे द्यायचे असेल तर त्यासाठी हा व्हर्टिकल सबमर्सिबल पंप वापर केला जातो.
सेंट्रीफ्युगल पंप माहिती मराठी :- हा पंप दुहेरी कोन इम्प्लिमेंटल द्वारे याला वापरल्या जाते. किंवा ऑपरेट केला जातो. आणि याची उंचीवर म्हणजेच हा जो पंप आहे हा अधिक उंचीवर नेण्यासाठी फायद्याचा ठरतो. आणि वेगाने पाणी उचलण्यासाठी हा पंपाचा उपयोग केला जातो.
शेतीसाठी सेंट्रीफ्युगल पंप हे उपयोगाचे असून मोठ्या प्रमाणावर पाणी उंच जागेवर नेण्यासाठी याची क्षमता आहे. त्यामुळे जसे नाले, विहीर, कालवे, तसेच तलावातून पाणी उच्च ठिकाणावर न्यायचे असल्यास तुम्ही सेंट्रीफ्युगल पंप वापरू शकता.
हायड्रोलिक रॅम पंप माहिती मराठी :- हायड्रोलिक पंप देखील खूपच महत्वाचा आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा एक उंचसीमेपर्यंत पाणी न्यायचं काम करतो म्हणजे उंचीपर्यंत काम करतो. आणि हायड्रोलिक पंप वापर करून पाणी उंचीवर पोहोचवण्याचा मदत करतो.
दाब आणि जलद कार्यक्षमता हे हायड्रोलिक प्राईम पंपाची वैशिष्ट्ये आहेत. विहीर किंवा तलाव तुम्हाला पाणी शेतात न्यायचे असेल तर हा हायड्रोलिक पंप तुम्हाला वापरता येतो, अशा प्रकारे हा पंप आहे. अशा प्रकारे शेतीबद्दलच्या माहिती जाणून घ्यायच्या असल्यास आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा. अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते.