Anandacha Siddha Vastu in Marathi | आनंदाचा शिधा म्हणजे काय ? | आनंदाचा शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार ? | आनंदाचा शिधा कधी मिळणार ?

Anandacha Siddha Vastu in Marathi :- नमस्कार सर्वांना, आता रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. गौरी गणपतीतही आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशनधारकांना हा लाभ मिळाला. आता गौरी गणपती आणि त्यानंतर दिवाळीसाठी

शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील नागरिकांना या ठिकाणी किंवा कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून फडणवीस-शिंदे सत्तेत आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम मागील वर्षे दिवाळीत रेशन धारकांना दिवाळी गिफ्ट म्हणून शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा वितरित केला होता.

Anandacha Siddha Vastu in Marathi

पाच वस्तू असलेल्या हा आनंदाचा शिधा आहे. यशस्वीरिता जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. त्यानंतरच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साधून दुसऱ्यांदा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला.

त्यात आता गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने गौरी गणपती आणि दिवाळीच्या निमित्त साधून तिसऱ्यांदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता गोरगरिबांना या ठिकाणी आनंदाचा शिधा म्हणून 100 रुपयांत हा मिळणार आहे. आनंदाचा शिधा हा नागरिकांना मिळणार आहे, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे ? हे या ठिकाणी पाहणार आहोत. या मध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत खाली पहा.

📑 हे पण वाचा :- 15 दिवस उजेड, 15 दिवस अंधार… चंद्रयान-3चे लँडर जिथे उतरले चंद्रावरील ती जागा कशी आहे?; जाणून घ्या एका क्लिकवर

आनंदाचा शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार ?

  • आनंदाचा शिधा म्हणजे काय ? लाभार्थ्यांना राज्य शासनाने
  • एक किलो रवा,
  • चणाडाळ
  • साखर
  • एक लिटर खाद्य तेल, असा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा शिधा 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सव निमित्त व त्यानंतर 12 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळीला वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे गौरी गणपतीच्या निमित्त याठिकाणी अशा या 4 वस्तू दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारचे हे एक अपडेट आहे, जे तुमच्या खूपच महत्वाचे ठरणार आहे.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !