App

या App ना कर्ज देण्याचा परवाना नाही !

यामध्ये अनेक ॲप्स चीन, इंडोनेशियातील आहेत. डिजिटल लोन च्या माध्यमातून ही नागरिकांना अडकवतात. आरबीआयकडून कर्ज देण्याचा परवाना न काढताच यांचा गोरखधंदा सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई, ठाणे, पुण्याचे, देशातील अनेक शहरात त्यांचे कारनामे उघडे झाले आहेत.

हे इन्स्टंट लोन अगदी काही मिनिटातच मिळते. तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, याचे कॉपी अँप्स वर अपलोड करावी लागते. त्यानंतर काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर कर्ज मंजुरीचा मेसेज येतो. आणि थोड्यावेळात तुमच्या हातात कर्ज रक्कम जमा होते.

App

कधी कधी तर केव्हा पॅन कार्ड आधार कार्ड वरच कर्ज देते. हे ॲप्स चिनी आणि इंडोनेशियातील आहेत. त्यांचा बँक अथवा गैर बँकिंग संस्थाशी किंवा NBFC काहीच संबंध नाहीत.

कसे फसवतात हे तुम्हाला ?

कर्जदार गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड करतो. त्यानंतर त्यांच्याकडून अटी, शर्तीसाठी परवानगी घेण्यात येते. आणि बरेच जण लगेच कर्ज मिळत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. फोटो, गॅलरी, जीमेल, कॉन्टॅक्टर लिस्ट, हे एक्सेस मिळवतात.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !