Ashadhi Wari 2023 Timetable :- आज या लेखात आषाढीवारी कधी ? आणि त्यासोबत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अर्थातच आषाढी वारी 2023 चा संपूर्ण टाईमटेबल जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्यातील देहू आणि आळंदी नगरी आषाढी वारीसाठी पुन्हा आता सज्ज झाली आहे.
जगतगृरू संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतुन होणार आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत.
Ashadhi Wari 2023 Timetable
यासाठीच देहू आणि आळंदी नगरीतून जगतगृरू संत तुकाराम आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी आता या सज्ज झालेल्या आहेत.
पालखी सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जून 2023 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
या सोबतच संत तुकाराम महाराजांची पालखी व संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यात्रा यासोबत मार्ग कोणता आहे ?. पालखी सोबत निघालेली दिंडी कुठे विसावा घेणार ?, याची संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.
संत तुकाराम महाराजांचे पालखीचे संपूर्ण वेळापत्रक
- 10 जून :- देहू या ठिकाणावरून पंढरपूर कडे प्रस्थान होणार
- 11 जून :- रोजी आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर
- 12 जून :- नाना पेठ पुणे येथे राहील
- 13 जून :- नाना पेठ पुणे
- 14 जून :- लोणी काळभोर
- 15 जून :- यवत (पालखीतळ)
- 16 जून :- वरवंड
- 17 जून :- वळवंडी गावळ्यांची
- 18 जून :- बारामती (शारदा विद्यालय)
- 19 जून :- सणसर
- 20 जून :- आंथुर्णे, (पालखीतळ)
- 21 जून :- निमगाव केतकी
- 22 जून :- इंदापूर
- 23 जून :- सराटी
- 24 जून :- अकलूज (माने विद्यालय)
- 25 जून :- बोरगाव
- 26 जून :- पिराजी कुरोली गायरान
- 27 जून :- वाखरी
- 28 जून :- श्री क्षेत्र पंढरपूर
- 29 जून :- आषाढी एकादशी
अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांची पालखीचे संपूर्ण वेळापत्रक आहे. आता गोल आणि उभे रिंगण कधी आणि कुठे होणार आहे ? याबाबत माहिती पहा खालीलप्रमाणे आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी रिंगण 2023, Ashadhi Wari Gol Ringan Dates and Place 2023
- 19 जून :- काटेवाडी (मेंढ्यांचे गोल रिंगण)
- 20 जून :- बेलवंडी (गोल रिंगण) 22 जून :- इंदापूर (गोल रिंगण)
- 24 जून :- अकलूज (माने विद्यालय गोल रिंगण)
- 25 जून :- माळीनगर (उभे रिंगण)
- 27 जून :- बाजीराव विहीर उभे रिंगण 28 जून पंढरपूर (उभे रिंगण)
असे गोल आणि उभे रिंगणचा टाईमटेबल असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे संपूर्ण वेळापत्रक 2023
अंतर्गत कुठून कशी प्रस्थान होणार आहे ? कुठे विसावा घेणार आहे ?. याचे संपूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे आहेत.
- 11 जून :- रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
- 12 जून :- भवानी पेठ पुणे
- 13 जून :- पुणे
- 14 जून :- सासवड पुणे
- 15 जून :- सासवड
- 16 जून :- जेजुरी
- 17 जून :- वाल्हे
- 18 जून :- लोणंद
- 19 जून :- लोणंद
- 20 जून :- तरडगाव
- 21 जून :- फलटण विमानतळ
- 22 जून :- भरड
- 23 जून :- नातेपुते
- 24 जून :- माळशिरस
- 25 जून :- वेळापूर
- 26 जून :- भांडीशेगाव
- 27 जून :- वाखरी
- 28 जून :- पंढरपूर
- 29 जून :- आषाढी वारी
यासोबतच उभ्या आणि आषाढीवारी गोल रिंगण कधी आणि कुठे असणार आहेत ? हे जाणून घेऊया.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण 2023, Ashadhi Wari Gol Ringan Dates and Place 2023
- 20 जून :- चांदोबाचा लिंबू (उभे रिंगण)
- 24 जून :- पुरंदवडे (गोल रिंगण)
- 25 जून :- खुडूस फाटा (गोल रिंगण)
- 26 जून :- ठाकूरबुवाची समाधी (गोल रिंगण)
- 27 जून :- बाजीरावाची विहीर (उभे आणि गोल रिंगण)
- 28 जून :- पंढरपूर (उभे रिंगण)
असे संपूर्ण वेळापत्रक असणार आहे.
📋 हेही वाचा :- बेलाचे पान खाण्याचे फायदे | महादेव यांना वाहिल्या जाणाऱ्या बेल पत्र खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या !