Atal Pension Yojana | केंद्राची भन्नाट योजना फक्त 210 रु. 5 हजार रु. पेन्शन संधी सोडू नका, भरा ऑनलाईन फॉर्म

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जे आपण 210 रुपये जमा करून 5 हजार रुपये दरमहा पेन्शन घेऊ शकता. तर ही योजना कोणती आहे, या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ?. (atal pension yojana in marathi) कागदपत्रे, कोणते लागतात ?, पात्रता काय लागते ? ही संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण शेवट पर्यंत वाचा.

 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Atal Pension Yojana

ही योजना विविध बँक किंवा पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये उपलब्ध आहे. या योजनेची अँप्लिकेशन उपलब्ध आहे, त्यामुळे योजनेची आद्यवत माहिती आपल्याला मिळत राहते. आपण ही भविष्यासाठी चांगल्या पेन्शन योजनेचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी अटल पेन्शन योजना हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्या नंतर आपल्याला दरमहा पेन्शन सुरू होते. तर या योजनेत लाभ कसा घ्यायचा व वयानुसार किती पैसे दरमहा भरावे लागेल. हे संपूर्ण जाणून घेणार आहोत. तर पुढे दिलेली संपूर्ण माहिती जाणून घ्या.

अटल पेंशन योजना वय अट ?

या अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे आहेत. कोणताही भारतीय नागरिक या (atal pension yojana) चा लाभ घेऊ शकतो. परंतु या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. आणि हो या योजनेत महिन्याला किती योगदान (Rupees) द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते. ही आहे योजनेची वयाची अट व महत्त्वाची अटी, शर्ती महत्वपूर्ण अपडेट.

अटल पेन्शन योजनेचा लाभ ?

किमान 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयाच्या 18 व्या वर्षी, जास्तीत जास्त 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, त्याला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376 रुपये, तर 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये, 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये. आणि 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये योगदान आहे. पती-पत्नी असे संयुक्त खाते उघडता येते. तसेच त्यांना वेगवेगळी खाती ही उघडता येतात. त्यानुसार त्यांना हे योगदान वेगळे द्यावे लागेल.

Atal Pension Yojana

पोस्ट ऑफिसची नवीन विमा योजना फक्त ३९९ रु. 10 लाखांचा विमा येथे पहा क्लिक करून लगेच 

अटल पेन्शन योजना ऑनलाईन खाते कसे उघडायचे ?

अटल पेन्शन योजनेचे खाते ऑनलाईन उघडता येते. त्यासाठी आपल्याकडे Sbi Bank मध्ये खाते असल्यास नेट बँकिंग द्वारे खाते उघडता येते. किंवा लाभ घेता येतो. (atal pension yojana online apply) किंवा आपण बँक मध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये याविषयी अधिक माहिती घेऊन योजनेचे खाते उगडू शकता.

Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजनेची अधिकृत pdf फाईल येथे पहा क्लिक करून 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

1 thought on “Atal Pension Yojana | केंद्राची भन्नाट योजना फक्त 210 रु. 5 हजार रु. पेन्शन संधी सोडू नका, भरा ऑनलाईन फॉर्म”

  1. Pingback: Atal Pension Yojana Benefits | केंद्राची नवीन योजना फक्त 7 रु. मध्ये 60 हजार रु. मिळणार त्वरित करा अर्ज पहा संपूर्ण माह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !