Ativrushti Nuksan Bharpai 2021 | अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी मदत

Ativrushti Nuksan Bharpai 2021 | अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी मदत

Ativrushti Nuksan Bharpai 2021

Ativrushti Nuksan Bharpai 2021 | अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी मदत

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय सरकार कडून शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रु. ची

मदत जाहीर करण्यात आले आहे, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे व यासाठी काय हेक्टरी मदत दिली

जाणार आहे अतिवृष्टी १० हजार कोटी मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे, कोणत्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती व कशी मदत देण्यात येणार आहे, त्याचबरोबर मार्च,एप्रिल, मे या कालावधीत नुकसान व

अवेळी पाऊसामुळे विविध शेत पिकांचे भरपूर अश्या प्रमाणात नुकसान झाल यासाठी राज्य शासनाने मदत म्हणून 122 कोटी

26 लाख रु. मदत जाहीर.

जुलै 2021 साठी 365 कोटी. रु.

तसेच जुलै 2021 च्या महिन्यात अवेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रु. 365 कोटी रु. मंजूर करण्यात आले आहे, त्यातच आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आज रोजी (13-10-2021) शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला अतिवृष्टी व पूरग्रस्त यांना एकूण 10 हजार कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे, 10 हजार कोटी रु. शेतकऱ्यांना काय हेक्टरी मिळेल संपूर्ण माहिती खाली दिली आहे ते आपण आवश्य पहा. 

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय 

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Ativrushti Nuksan Bharpai 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम

मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत

अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे

बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर

करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अशी राहील शेतकऱ्यांना मदत

  1.  जिरायतीसाठी पिकांसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
  2.  बागायतीसाठी पिकांसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
  3.  बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

नुकसान भरपाई मदत मर्यादा 

मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत जमीन धारकांना हि मदत दिली जाणार आहे, आज राज्याचे कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी हि माहिती दिली आहे.


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो संपूर्ण माहिती:- येथे पहा 

📢 प्रधानमंत्री ट्रक्टर अनुदान योजना 2021 online अर्ज सुरु:- येथे पहा  

📢 ट्रक्टर योजना अर्ज कसा करवा:- video येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !