Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र | या 11 जिल्ह्यातील 14 लाख शेतकऱ्यांना 1071 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra :- शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर आहे. तर राज्यातील या 11 जिल्ह्यांमध्ये 14 लाख शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण माहिती आहेत, अधिक सविस्तर माहिती पाहूया. जून-जुलै 2023 या 2 महिन्याच्या

कालावधीत झालेल्या शेत जमिनीच्या नुकसान करिता 1071 कोटी रुपयांचा निधी 14 लाख 93180 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहेत. आता शेतकऱ्यांना ही मदत थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

यावेळी अतिवृष्टी, वादळ, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते. यामुळे पुढील हंगामामध्ये हा निधी उपयोगी पडावा यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामामध्ये एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद

निधीमधून ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जून जुलै 2023 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जमिनीचे नुकसान झालेल्या बाधित्तांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 1071 कोटी रुपयाचा निधी 77 लाख 1 हजार रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र

यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु ही भरपाई कशी मिळणार आहे ? यासाठी निकष काय आहे हे महत्त्वपूर्ण आहे. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर, इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता केली जाणार आहे.

सोबतच शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65. मिलिमीटर पेक्षा जास्त नोंद झाली असल्यास आणि त्या मंडळातील गावांमध्ये 33% पेक्षा

जास्त नुकसान झाले असल्यास मदत राहणार आहेत. म्हणजेच त्यांना लाभ मिळणार आहे. ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही. या बाबत महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला आहेत.

📝 हे पण वाचा :- या दिवाळी मध्ये घरकुल यादीत नाव चेक करा पहा तुमचे नाव आले का ? ही आहेत नवीन पद्दत !

Leave a Comment