Ativrushti Nuksan Bharpai :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट जी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने नुकसान भरपाई संदर्भात मोठी घोषणा केली आहे. आणि आता शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास भरपाई झाल्यास त्यांना दुप्पट या ठिकाणी भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आज रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याकरिता हा लेख आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. या लेखांमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले असून जवळपास १५ लाख हेक्टर पर्यंत शेतीचे नुकसान झालं आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी NDRF च्या नियमापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई सरकार देईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर २ हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती ३ हेक्टर केली आहे. ज्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल. NDRF च्या नियमानुसार ६८०० रुपये मिळत होते, मात्र आता याच्या दुप्पट पैसे आम्ही शेतकऱ्यांना देऊ असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.
नुकसान भरपाई अनुदानात मोठी वाढ
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान होतं त्यासाठी पंचनामा झाले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने आतापर्यंत कधी एवढी भरपाई मिळाली नव्हती. तेवढी, एनडीआरएफच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बॅठकीत घेण्यात आला आहे, असं शिंदे म्हणाले.
📢 ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे क्लिक पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा