Bal Sangopan Yojana Information in Marathi | Bal Sangopan Yojana | बालसंगोपन योजना फॉर्म pdf | बाल संगोपन योजना काय ? अर्ज नमुना, पात्रता, शासन निर्णय

Bal Sangopan Yojana Information in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेऊया. ज्या योजनेचे नाव बाल संगोपन योजना महाराष्ट्र माहिती मराठी या संदर्भातील संपूर्ण

माहिती आज जाणून घेऊया. आता मुलांच्या संगोपनासाठी शासनाकडून दरमहा 2250 रुपये मिळणार आहे. आणि यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे ?.

यासंबंधीतील कागदपत्रे, पात्रता, सविस्तर माहिती आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. कोणत्या मुलांना या ठिकाणी हे दरमहा 2250 रुपये मिळणार आहे, याची माहिती जाणून घेऊया.

योजनाबाल संगोपन योजना महाराष्ट्र
कोणी सुरुवात केली ?महाराष्ट्र सरकार
योजना आरंभ2005
लाभार्थीराज्यातील 0 ते 18 वर्षा खालील मुले
अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in/
योजनेचा उद्देश्यराज्यातील अनाथ आणि गरीब बालकांची आर्थिक मदत व त्यांना कौटुंबिक आधार देणे
विभागमहिला व बालविकास विभाग
अर्ज पद्धतऑफलाईन
आर्थिक मदतया योजनेच्या अंतर्गत बालकांना दरमहा 2250/- रुपये आर्थिक अनुदान देण्यात येते
वर्ष2023
श्रेणीराज्य सरकार

Bal Sangopan Yojana Information in Marathi

बाल संगोपन ही एक सरकारी योजना असून या योजनेत 0 ते 18 वर्ष वयोगटातील पालकांचा यामध्ये समावेश आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत परिपोषण अनुदान अनुदान मध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती बाल संगोपन योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ? कसा अर्ज करायचा आहे ? कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती आज लेखाच्या मध्ये जाणून घेऊया.

बालसंगोपन योजना माहिती

महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2005 मध्ये बालसंगोपन योजना राज्यामध्ये सुरू केली होती. या योजने अंतर्गत बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे

यासाठी बालसंगोपन योजना राबवण्यात आली आहे. राज्यातील 50000 पेक्षा अधिक बालकांना योजनेचा लाभ मिळत आहे. या योजने पात्र लाभार्थी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

बालसंगोपन योजना अंतर्गत किती रुपये मिळतात ?

बाल संगोपन योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो ? ही माहिती पाहूया. बाल संगोपन योजनेअंतर्गत यापूर्वी देण्यात येणाऱ्या लाभार्थी अनुदानामध्ये निर्देशानुसार वाढ करण्याचा प्रस्ताव होते.

आता वाढ झाली आणि बालसंगोपन योजनेअंतर्गत बालसंगोपणासाठी पालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दरमहा 1100 पर्यंत लाभ मिळत होता. तर तो वाढून 2250 रुपये करण्यात आला आहे.

बाल संगोपन योजनेअंतर्गत कसा लाभ मिळतो रोख स्वरूपात मदत देण्याची पद्धत बंद करून आता फक्त धनादेश द्वारे त्यांच्या बँक खात्यात 2 हजार 250 रुपये महिन्याला सदर रक्कम जमा करण्यात येत असते. बाल संगोपन योजनेमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो ?

📑 हे पण वाचा :- सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना मराठी | सुरक्षित मातृत्व हमी योजना फायदे | सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना काय ?, लाभ, फायदे संपूर्ण माहिती !

बाल संगोपन योजना कोणते मुले पात्र ?

 1. यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील पालकांचा समावेश होतो. परंतु यामध्ये कोणते बालक पात्र असू शकतात ?
 2. अनाथ बालके ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी बालके, बालक दत्तक देणे शक्य होत नाही,
 3. कोविड कालावधी दोन अथवा एक पालक गमावलेले बालके, एक पालक असलेली व फॅमिली चेरीस मध्ये
 4. असलेली बालके, मृत्** ,घटस्फोट, विभक्तीकरण, त्वरित अविवाहित, मातृत्व गंभीर आजार पालक,
 5. रुग्णालयात असल्या या कारणामुळे विघटित झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरोग व
 6. जन्म ठेपीची शिक्षा भोगत असलेले कैद्यांची बालके, एचआयव्ही ग्रस्त बालके, तीव्र मतिमंद बालके, बहु
 7. विकलांग बालक, दोन्ही पालक आई-वडील दिव्यांग अपंग अशी बालके पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव
 8. अतीय, फेटाळणी व दुर्लक्ष न्यायालयीन किंवा पोलीस प्रकरणात अशी अपवाद दात व मग परिस्थितीतील
 9. मधील बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार कामगार विभागाने सुटका व प्रामाणिक केलेली बालके.
 10. तुरुंगात असलेले पालक एच आय वी ग्रस्त, कॅन्सर सारखे दूरधर आजाराने बाधित असलेले पालक कौटुंबिक
 11. हिंसाच्या प्रकरणातून केलेली आई वडील अशा दोन्ही बालके पात्र असे असलेल्या बालकांना लाभ दिला जातो. या व्यतिरिक्त असणारे बालक यांना हा बाळ संगोपन योजनेचा लाभ मिळत नाही.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे कोणती?

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाच्या फाईल सोबत इतर कागदपत्रे जोडावी लागतात. पालकांच्या आधार कार्ड, बालकांच्या आधार कार्ड, जन्म दाखला
 • रहिवासी दाखला आई वडील मृत असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाचा एकत्रित फोटो, बालक दिव्यांग मतिमंद बहु विकलांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग बालकाचे पूर्ण फोटो, पालकाचे बँक किंवा पोस्टाची पासबुक झेरॉक्स निकष नुसार इतर कागदपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी हे कागदपत्रे लागतील.

बाल संगोपन योजना अर्ज नमुना पीडीएफ इन मराठी

बाल संगोपन योजना लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकतात. पुढील लिंक वर जाऊन तुम्हाला बाल संगोपन योजना अर्ज नमुना पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे.

येथे क्लिक करून बाल संगोपन योजनेचा अर्ज नमुना डाउनलोड करा

बाल संगोपन योजना अर्ज कुठे कसा करावा ?

बाल संगोपन योजनेचा अर्ज तुम्ही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करावे लागतात. बाल संरक्षण समिती तुमच्या अर्जाची

पडताळणी करेल आणि पडताळणी झाल्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाईल. बँकेत दरमहा परिपोषण अनुदान मिळणार आहे. संपर्क तुम्हाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी करायचा आहे.

यासंबंधीतील शासन निर्णय व फॉर्म pdf तुम्हाला खाली देण्यात आला आहेत. तुम्ही अशा प्रकारे बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता,

ही महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. अधिक माहितीचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पाहू शकता, त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.

📑 हे पण वाचा :- मूळ शासन निर्णय pdf डाउनलोड करा

📑 हे पण वाचा :- बाल संगोपन शासन निर्णय डाउनलोड pdf

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !