Bal Sangopan Yojana Maharashtra | मुलांना शिक्षण घेण्यासठी मिळणार दरमहा 1100 रु, तुम्ही असाल का पात्र ? जाणून घ्या पटकन !

Bal Sangopan Yojana Maharashtra : नमस्कार आपण आज शासनाच्या एक नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तसे तर शासन हे देशातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी बऱ्याच नाव नवीन योजना हे राबवत असते.

तशीच ही एक योजना आहे. जी देशातील गरीब कुटुंबातील मुला मुलींसाठी आहे. या योजनांतर्गत जे मूल गरीब कुटुंबातील आहेत. अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी दर महिन्याला 1100 रु मिळणार आहे.

चला तर बघू की योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कुठे सादर करायचा आहे. व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे. या योजनेच्या अटी काय असतील या बाबत सविस्त माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

Bal Sangopan Yojana Maharashtra

बातमी अशी आहे की महाराष्ट्र शासनाची बालसंगोपन नावाची एक योजना सुरू करण्यात आली आहे. आणि ही योजना आपल्या बऱ्याच अशा मित्रांना माहिती नाहीये.

आणि त्यांना माहिती व्हावी यासाठी आपण ही माहिती घेऊन आलो आहे. या योजनेत ज मूल आपल्या आर्थिक परिस्थिती मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाही.

📢 हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईल वर कशी करावी पहा संपूर्ण माहिती 

अश्या मुलांसाठी शासनाने त्यांचे शिक्षण व्हावे या साठी त्यांना काही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या आणि या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर तुम्हला अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे. ही सर्व माहिती आम्ही खाली दिली आहे.

कोणत्या मुलांना मिळणर योजनेचा लाभ

आपला महाराष्ट्र शासनाची ही बालसंगोपन योजना आहे. ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई वडील दोन्ही नसतील अर्थातच अनाथ अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ त्यांना एक ते 18 वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनांचा लाभ घेता येणार आहे. एकाच परिवारातील दोन किंवा जास्त मुलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

किती वर्ष मिळतो लाभ 

जिल्हा परिषद शाळेत व महाविद्यालयात किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला. बोनाफाईड आत्ताच शाळेतून काढून ठेवावा जेणेकरून तो उपयोगी पडेल या योजनेचा लाभ एक ते 18 वर्षे पर्यंत बालकांच्या

शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांना दिला जाणार आहे. ही योजना तशी बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. पण अनेक पालकांना ही योजना माहित नाही म्हणून आपण हा लेख वाचून आपल्या मुलांसाठी दरमहा अकराशे रुपये योजनेचा लाभ घ्यावा.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड चे झेरॉक्स पालकांचे व बालकाचे
  • शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
  • पालकाची मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
  • पालकाचा रहिवासी दाखला
  • मुलांचे बॅक पासबुक झेरॉक्स
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो
  •  मुलाचे पासपोर्ट फोटो दोन
  • पालकांचे पासपोर्ट फोटो

कुठे भरायचा फॉर्म

या योजनेचा अर्ज तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर करायचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 Comment