Bamboo Farming | पडीक जमीनीतून या पिकांची शेती करून मिळवा, उसा पेक्षा दुप्पट उत्पादन, खर्च ही निम्याहून कमी मग वाट कसली बघता ? करा लागवड

Bamboo Farming :- शेतकरी बांधवांनो तुम्हाला देखील पडीक जमिनीतून कमाई करायची ? तर यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. आज अशा पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, तुमची पडीक जमिनीतून तुम्ही उसापेक्षा जास्त उत्पादन यातून करू शकतो.

असे कोणते पीक आहे कसा लाभ घ्यायचा आहे आणि नेमकी काय यासंबंधीतील माहिती हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. उसापेक्षा कमी पाणी आणि जास्त भाव मिळून देणारे बांबू पिक अधिक प्रमाणात इथेनॉल साठी प्रसिद्ध आहे.

Bamboo Farming

बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम बांबू लागवड करत असते. याचीच अधिक माहिती आपण पाहूया, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड अभियान (सातारा) राबवण्यात येत आहे. यामध्ये दहा गुंठ्यापासून ते एक हेक्टर पर्यंत बांबू लागवड करता येते.

बांबू ही शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोडधंदा मिळावा म्हणून शासन स्तरावर यासाठी प्रयत्न शासनकडून केली जात आहे. ऊसापेक्षा अधिक पटीने उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून ते टोपी, चप्पल, बुटापासून, इथेनॉल पर्यंत वस्तु या बांबूच्या आहेत.

Bamboo

बांबू लागवड

आता भारतात देखील बांबू पासून 1800 प्रकारच्या वस्तू बनवल्या जात आहे. ऊस लागवडी मधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन 2500 मिळतो. तसेच Bamboo Farming मधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन तुम्हाला चार हजार रुपये मिळतो.

शेतकरी आर्थिक दृष्ट्या यातून सक्षम होणार आहे. आणि हे कोणतेही चांगले जमिनत नाहीतर थेट तुम्ही पडीक जमिनीतील देखील करू शकता. तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते, जमिनीची धूप व जनसंवर्धन होते. बांबूचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षाचे आहे. पहिले दोन वर्षांमध्ये त्यात आंतरपीक घेता येते.

Bamboo Farming

हेही वाचा :- बांबू लागवड योजना 80% अनुदानावर अर्ज सुरु, मोबाईलवरून भरा फॉर्म व मिळवा 80% अनुदान वाचा माहिती

Bambu Sheti Faydyachi aahe ka ?

जोपर्यंत ते झाडे लहान आहे तोपर्यंत तुम्ही त्यात आंतरपीक घेऊ शकता. क्षारपड व नापीक जमिनीवर तुम्ही बांबू लागवड करून शकता. तर आता कृषी अवस्थेला भर देण्यासाठी बांबू पासून इथेनॉल निर्मिती केली जाते. आणि एक हेक्टर ऊस लावला तर दोन कोटी लिटर पाणी लागते.

एक टन ऊस गाळला तर 80 लिटर निघते, आणि एक हेक्टर बांबू लावले तर वीस लाख लिटर पाणी लागते. तर एक टन बांबूतून इथेनॉल 400 लिटर निघते. तसेच प्रति एकरी 40 टन उत्पादनांनी मिळते. ज्याच्या अंदाजे 2500 to 4000 प्रति टन आहे.

Bamboo Farming
Bamboo Farming

बांबू लागवड नियम ?

अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही जोरदार उत्पन्न यातून घेऊ शकता. यासंबंधीतील शासनाकडून देखील सातारा जिल्ह्यांमध्ये हे सध्या आव्हान लागवडीसाठी करण्यात आलेला आहे. आता जर आपण याचा माहिती अधिक पाहिली तर केंद्र शासनाकडून 2017 साली बांबू ही गवतवर्गीय असल्याचे घोषित केले आहेत.

आता संरक्षण कायद्यानुसार बांबू तोडण्यास कापण्यास व वाहतुकीसाठी परवानगीची आवश्यकता नाही. आता शेतकऱ्यांना पडीक जमिनी तसेच बांधावर Bamboo Farming करण्यासाठी 12 एप्रिल 2018 चे सामाजिक वनीकरण विभागाकडून अंदाजपत्रकाचे मान्यता देण्यात आलेले आहे.

Bamboo Farming

✅ हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

बांबू लागवड

आता याची लागवड आहे ही जी काही संपूर्ण माहिती आहे. कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना बांबू लागवडीकरिता मदत व मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या ऑफिस, ग्रामपंचायत मध्ये याची माहिती घेऊ शकता. आता याकरिता लाभार्थ्यांनी यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तालुकास्तरावरील पंचायत

समिती विभाग, कृषी विभाग, व सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयास भेट द्यावी. त्यानंतर वैयक्तिक बांबू लागवड अंतर्गत तीन मीटर बाय तीन मीटर या अंतरानुसार हेक्टरी 1100 रोपांची लागवड केल्यास तीन वर्षे पर्यंतच्या कालावधीत लाभार्थी यांना एकूण 6 लाख 90 हजार 90 रुपये रक्कम पर्यंतचा लाभ मजुरी स्वरूपात प्राप्त होतो.

अशा प्रकार तुम्ही यातून चांगले मोठे उत्पादन देखील कमवू शकतात. या योजनेच्या अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आणि या संबंधित जे काही शासनाचा अपडेट आहे हे शासनाच्या अधिकृत वेबसाईट महासंवाद 30 जून 2023 रोजी देण्यात आले आहे. अशा प्रकारचे Bamboo Farming एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 

Bamboo Farming

✅ हेही वाचा :- शेतीची अदलाबदल, शेती जमिनीचे सर्व वाद, भांडण, तंटे, प्रलंबित प्रकरणे सर्व मिटवा केवळ 2 हजार रु, शासनाची सलोखा योजना सुरू, पहा जीआर

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !