Best Buffalo for Milk :- आज म्हैस विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील म्हशींपालनातून नफा कमवण्याचा विचार करत असाल किंवा म्हशी पालन व्यवसाय तुम्ही सुरू केला असेल,
तुमच्यासाठी हा आर्टिकल महत्वाचा आहे. तुम्ही या जातीच्या म्हशी खरेदी करून मोठ्या प्रमाणात उत्पादन कमावू शकतात. या म्हशींची माहिती पाहणार आहोत.
ज्या म्हशी 900 ते 1300 लिटर पर्यंत दूध देते. अशी कोणती म्हैस आहे ? यांच्या कोणत्या जाती आहेत ? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती पाहू. सर्वात प्रथम म्हैस आहे.
Best Buffalo for Milk / मुऱ्हा म्हैस माहिती मराठी
मुऱ्हा म्हैस सार्वधिक दूध देणारी जात मानले जाते. भारतातील अनेक पशुपालक मुऱ्हा म्हशींचे संगोपन करून चांगला नफा कमवत आहे. आणि सोबतच दूध देण्याची क्षमता इतर सर्व देशी म्हशींच्या जातीपेक्षा खूप जास्त
प्रमाणात आहे. आणि या मुऱ्हा म्हशीचे पालन करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून या जातीच्या खरेदीवर अनुदान देखील दिलं जातं. तुम्ही देखील मुऱ्हा म्हैस खरेदी करून दूध उत्पादनात मोठी प्रमाणात वाढ करू शकतात.
या म्हशीचा रंग काळा आहे. या मुऱ्हा म्हशीला हरियाणामध्ये काळे सोने असे म्हटले जाते. सोबतच ही म्हैस दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते.
सध्या दुधाचे दर चांगले आहेत, पण या मुऱ्हा म्हैस किंमत पाहिलं तर मुऱ्हा म्हशीची किंमत बाजारात खूप जास्त प्रमाणात आहे.
याची मुऱ्हा म्हशीची किंमत जवळपास 50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत आहे. मुळा म्हशीची किंमत तिच्या दुधाच्या उत्पादनावर अवलंबून आहे.
जाफराबादी जातीची म्हैस माहिती मराठी
जाफराबादी जातीचे म्हैस बद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास ही म्हैसच तोंडही लहान आहे. शिंगे व्रक आहेत, सोबतच रंग काळा आणि त्वचा सैल आहे.
या जातीच्या म्हशीच्या कपाळावर पांढरे निशान असते, आणि सोबतच ही सर्वात या जाफराबादी म्हशीचे ओळख आहे. तर ही या म्हशींचे इतर जातीच्या म्हशींच्या वजनाने जड आहे.
वजन 800 ते एक टन पर्यंत आहे. रंग काळा आहे म्हैस इतर जातीपेक्षा जास्त दिवस दूध देते. आणि ही म्हैस दरवर्षी एक बछडे किंवा वगार देते.
ही म्हैस दुग्ध व्यवसायासाठी खूपच फायदेशीर आहे. दूध विकून किंवा जातीच्या म्हशींची विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. या म्हशीची किंमत 50 हजार रुपये पासून ते 1 लाख रुपये पर्यंत आहे.
✅ हेही वाचा :- पोस्ट ऑफिसची ही योजना करेल मालामाल, एवढीशी रक्कम गुंतवणूक करून दरमहा 9,250 रुपये मिळत राहील, फक्त आताच हे काम करा !
भदावरी जातीची म्हैस माहिती मराठी
भदरवरी जातीच्या म्हशीची माहिती जाणून घ्यायची असल्यास या म्हशीचा आकार मध्यम असतो. आणि अंगावर केस फारच कमी आहे, तर पाय लहान आणि मजबूत आहेत.
शिंगे तलवारीच्या आकाराचे आहेत. आणि मानेच्या खालच्या भागात दोन पट्टे आढळतात. ज्यांना कंठ माळा म्हणतात, त्याचा आयनचा रंग गुलाबी आहे.
जातीचे सर्वात मोठ वैशिष्ट्य म्हणजे या म्हशीच्या जातीमध्ये कठीण परिस्थितीत जगण्याची क्षमता आहे. या जातीचे म्हैस दररोज सरासरी 5 ते 6 लिटर दूध देते.
व्यवस्थित आणि पौष्टिक आहार दिल्यास त्यातून दररोज 8 ते 10 लिटर दूध मिळते. भद्रावती म्हशीची किंमत 60,000 पासून 1 लाख रुपये पर्यंत आहे.
सुरती म्हशीची माहिती मराठी
या जातीच्या म्हशीचा रंग गंजलेल्या तपकिरी आणि चांदीच्या करड्या किंवा काळाचा रंग आहे. या दुधात म्हणजेच या सुरती म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त आहे.
मर्यादित सुविधा आणि साधनसामग्री मध्ये ही सुरती म्हशींची जातीची ही जात दुधाचे चांगले उत्पादन देते. आणि या म्हशीला खाद्याची गरज इतर जातीच्या तुलनेत कमी आहे.
आहाराचा खर्च कमी आहे, त्यामुळे कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरती म्हशीची जात फायदेशीर आहे. सुरती म्हशीचे वजन 400 ते 410 किलो पर्यंत आहे.
दुधात 8 ते 12 टक्के हा फॅट तर या जातीचे म्हशीं एका शेळीमध्ये 900 ते 1300 लिटर दूध देते. तर बाजारात सुरती म्हशीची किंमत 30 हजार किंवा त्याहून अधिक आहे. तर अशाप्रकारे हे या म्हशी एवढं दूध उत्पादन देतात.