Best Goat Breeds Maharashtra | Goat Breeds | या शेळीच्या जाती बनवतील मालामाल पहा संपूर्ण खरी माहिती

Best Goat Breeds Maharashtra

Best Goat Breeds Maharashtra :- नमस्कार सर्वांना. पशुपालक तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती या लेखात आज जाणून घेणार आहोत. शेळीपालनातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी आपल्याला शेळी सुद्धा चांगल्या जातीची हवी असते. आणि त्यासाठी या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत. टॉप 5 जातींच्या शेळ्या विषयी माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. आपण या जातींच्या शेळी पालन करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकता. तर याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर करा.

Best Goat Breeds Maharashtra

सिरोही (अजमेरी) शेळी विषयी माहिती :- ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजूबाजूच्या भागात आढळून येते. हि जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे. या जातीच्या शेळ्या बांध्याने मजबूत असून मध्यम आकाराच्या असतात. रंग फिकट तपकिरी असून त्यावर गडद रंगाचे मोठे ठिपके असतात. शिंगे मध्यम असून मागे वळलेली असतात. नराचे वजन ५० किलो तर मादीचे वजन २५ किलो असते.

ब्लॅक बंगाल शेळी विषयी माहिती

या जातीच्या शेळ्या प. बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. कातडी मऊ असल्याने भारतात आणि परदेशात तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही जात एका वेळी दोन किंवा तीन पिलांना जन्म देते. शेळ्या रंगाने काळ्या आणि तांबड्या असतात. शेळ्यांचे सरासरी वजन १५ किलो असते.

जमनापरी शेळी विषयी माहिती

जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध व मांसासाठी ही जात प्रसिद्ध आहे. या जातीच्या शेळ्या दणकट, चपळ, देखण्या,उंच व रंगाने पांढऱ्या, पिवळसर असतात. या जातीच्या नराचे वजन ६० ते ९० किलो व मादीचे वजन ५० ते ६० किलो असते. एका वेतात ( ३०५ दिवसात) शेळी ६०० लिटर दूध देते. या जातीमध्ये एकावेळी दोन करडे देण्याचे प्रमाण आहे.

बारबेरी शेळी विषयी माहिती

ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलिगढ या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे. नराचे वजन ४० ते ५० किलो व मादीचे वजन ३५ ते ४० किलो असते. रंग पंधरा असून अंगावर काळे ठिपके आढळतात. पाय आखूड असल्याने त्या बुटक्या दिसतात. शेळ्या १५ महिन्यात दोन वेट देतात. या दोन किंवा तीन करडांना जन्म देतात. या शेळ्या सरासरी रोज १.५ ते २ लिटर दूध देतात. एका वेतात साधारणपणे २५० ते ३०० लिटर दूध मिळते.

 goat breeds in india

हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु पहा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म 

उस्मानाबादी शेळी विषयी माहिती

या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात. या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत. यांचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात. या जातीत बरेचदा काळा किंवा पांढरा रंग सुद्धा आढळतो.

 goat breeds in india

हेही वाचा; शेळी पालन करून लाखों रु. कमवायचे का ? मग या जातीच्या शेळ्याचा व्यवसाय येथे माहिती 


📢 शेतजमीन मोजणी कशी करावी ते पण मोबाईल वरून सविस्तर माहिती  :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top