Bhausaheb Fundkar Falbag Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? संपूर्ण माहिती व्हिडीओ सोबत उपलब्ध !

Bhausaheb Fundkar Falbag Yojana :- योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 पासून राज्यात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड  बाबीचा लाभ देऊ शकत नाही.

अश्या लाभार्थ्यांना त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे, सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते सध्या ही योजना महाडीबीटी पोर्टल वर (एक शेतकरी अनेक योजना) या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana

योजनेचा लाभ व अटी ? :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लाभार्थ्यांना १००% टक्के अनुदान देण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी

30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के याच्यात 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे तीन वर्षे देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा

लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांची जीविताचे प्रमाण बागेतील झाडांच्या 90 टक्के तर करोडो झाडांसाठी 80 टक्के ठेवण्यास आवश्यक आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाला याचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण

विभागात कमीत कमी दहा गुंठे तर जास्तीत जास्त दहा हेक्टर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथमता योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे.

उर्वरित क्षेत्रासाठी वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून लाभार्थी या योजनेत लाभ घेऊ शकतात,
अल्प अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकर्‍यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

फळबाग लागवड योजना पात्रता

लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य, सर्व प्रवर्ग अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे.

त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल (कुटुंबाची व्याख्या पती-पत्नी व अज्ञात मुले) वैयक्तिक शेतकऱ्यांना देय अनुदान आहे.

संस्थात्मक लाभार्थ्यांना दिली नाही, शेतकऱ्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकरी स्वतःच्या हिश्याच्या मर्यादित लाभ घेता येईल.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana

📋हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

Mahadbt Falbag Yojana

सातबारावर कुळाचे नाव नसल्यास कुळांची संमती आवश्यक परंपरगत वननिवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.

इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील भागानुसार च्या क्षेत्रामध्ये त्यात शेतकर्‍यांना लाभ घेता येईल.

योजनेस आवश्यक कागदपत्रे

  1. सातबारा व आठ अ उतारा
  2. हमीपत्र
  3. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची संमती पत्र
  4. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

योजनाचे अनुदान 

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 3 टप्यात अनुदान दिले जाते पहिल्या टप्यात 50% टक्के अनुदान दुसऱ्या टप्यात 30% टक्के अनुदान व तिसऱ्या टप्यात 20% असे एकूण अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.

Education Personal Loan

शेतकऱ्यांना खूशखबर, केंद्र सरकारच्या या ऍप वरून मिळवा डिजिटल सातबारा, सरकारने केले नवीन अँप लॉन्च !

फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Online अर्ज कसा करावा व कागदपत्रे वर अर्ज नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती साठी आपल्याला खाली दिलेला हा Video संपूर्ण पाहायचा आहे

या मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. कोणत्या फळबाग कलमांना किती बाय किती असाव कोणत्या फळबाग  हेक्टरी किती कलम (रोपे) मिळणार पाहण्यासाठी खाली संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 


📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !