Bhumi Abhilekh Maharashtra Website :- भूमि अभिलेख विभागाने नवीन वेबसाईट सुरू केली आहेत. या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून भूमी अभिलेखच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहे.
या वेबसाईट च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सेवा पुढीलप्रमाणे सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार प्रत, व मालमत्ता पत्र, इ. ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहेत.
Bhumi Abhilekh Maharashtra Website
त्याचबरोबर नवीन फेरफार नोंदणी करायची असेल त्याकरिता ऑनलाईन अर्ज, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार ची स्थिती जाणून घेणे, क्षेत्र जाणून घेणे. प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे अभिलेखाच्या पडताळणी,
इ रेकॉर्ड्स ई नकाशा, म्हणजेच जमिनीचा भू नकाशा, त्यानंतर ई- मोजणी म्हणजेच जमीन मोजणी करिता चा ऑनलाईन अर्ज, ई क्यू जे कोर्ट, ई पीक पाहणी, आपली चावडी, ई चावडी, जमीन महसूल भरणा या बाबतची या सर्व सेवा आता स्वतःला ऑनलाईन वापरता येणार आहेत.
भूमि अभिलेख विभाग वेबसाईट

वरील सर्व सेवा वापरण्याकरिता भूमि अभिलेखच्या नवीन संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. यावर ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची याबाबत माहिती पाहणार आहोत.
भूमि अभिलेखच्या नवीन संकेतस्थळावरील सर्व सेवा वापरण्याकरिता ऑनलाइन नोंदणी कशाप्रकारे करायची याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहु.
🌍 भूमि अभिलेख विभागाची नवीन वेबसाईट येथे क्लिक करून पहा
भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र

भूमि अभिलेखच्या ऑनलाईन सेवा वापरण्याकरिता शासनाच्या वेबसाईट वर अगोदर नोंदणी ही करावी लागते. भूमि अभिलेखच्या ऑनलाइन सेवा तुम्हाला या ठिकाणी या ज्या दिसत आहे
या कशा प्रकारे वापरायच्या याबाबत व्हिडीओ तुम्ही पहा. या सेवा वापरण्याकरिता ऑनलाईन नोंदणी जी करावी लागते याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटला ओपन करावं लागेल.
📑 हे पण वाचा :- डिजिटल फेरफार कसे काढावे | जुना सातबारा, फेरफार कसे काढावे ? मोबाईलवरून पहा हा व्हिडीओ !
Bhumi Abhilekh Official Website
ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एक छोटसं चिन्ह या ठिकाणी दिसून येईल. या चिन्हावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी लॉगिन नोंदणी करा म्हणून हा पर्याय या
ठिकाणी दिसून येईल. तर या पर्यायावर क्लीक करून तुम्हाला नोंदणी करण्याकरिता क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता, त्याकरीता खाली देण्यात आलेला व्हिडीओ पहायचा आहेत.