Blueberry Sheti Mahiti in Marathi :- शेतकरी बांधवांनो शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. आता यातून समाधान मिळवण्यासाठी शेतकरी बांधव विविध प्रकारची शेती करून कमी खर्चात, कमी कष्टांमध्ये अधिक उत्पन्न मिळवत आहे.
परंतु आज ही शेती करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अडचणी येत असतात. जसे की कोणती लागवड करावी कोणत्या पिकांत जास्त नफा आहे ? नेमकी भाव किती मिळेल ? अशाच प्रकारची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे.
Blueberry Sheti Mahiti in Marathi
तब्बल 1000 रुपये प्रति किलो विकली जाणारे फळ हे एक एकरात शेती केल्यास याचं 60 लाख रु. उत्पन्न यातून मिळू शकते. या फळांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. देशातील काही शेतकऱ्यांनी अमेरिकन ब्लूबेरीची शेती सुरू केलेली आहे.
यातून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. देशातील शिकलेले लोक आता शेती कडे वळत आहेत. त्यामुळे शेतीच्या पद्धतीत बदल झालेले आहेत. युवक आता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. आणि यासोबतच धान, गव्हाची शेती करणारे शेतकरी फळबाग लागवड करत आहेत.

📒 हे ही वाचा :- तुम्ही शेतकरी आहात ? मग या गुलाब सफरचंदाची शेती करेल मालामाल, एक किलो तब्बल 100 ते 300 रु. पहा कशी करावी व उत्पादन ?
ब्लूबेरी शेतीचे फायदे व भाव ?
अशा प्रकारची विविध फळ किंवा आधुनिक पद्धतीने शेतकरी बांधव शेती करत आहेत. आता 1 हजार रुपये किलो विकले जाणारे हे ब्लूबेरी शेती करत आहेत. देशातील शेतकऱ्यांनी अमेरिकन ब्लूबेरीची शेती सुरू केलेले आहे. यातून चांगले उत्पादन शेतकऱ्यांचा मिळत आहेत.
आणि ब्लूबेरी हे महाग असलेले फळ आहे, ब्लूबेरी 1000 रुपये किलो पर्यंत विकले जाते. अमेरिकन ब्लुबेरी सुपरफ्रुट असं मानलं जातं. जगातील फळ लोकप्रिय आहे, परंतु भारतात त्याचे उत्पादन खूप कमी घेतले जाते. ब्लुबेरी यातून चांगला नफा तुम्हाला मिळवता येतो.
📒 हे ही वाचा :- शेतीतून लाखों रु. कमवायचे ? मग ही शेती करा 10 लाखांचे उत्पन्न, जरबेरा शेती यशस्वी शेती !
ब्लूबेरी शेती एकरी उत्पादन
एकदा लावल्यानंतर 10 वर्षापर्यंतचे उत्पादन घेता येते. भारतात अमेरिकन ब्ल्यूबेरीची शेती केली जात आहेत, आणि शेती करून लाखोंचा नफा मिळून देत आहेत. एकावेळी ब्लूबेरी लावल्यास 10 वर्षापर्यंत उत्पादन मिळत राहते.
ब्लुबेरी मध्ये बरेच विटामिन्स आणि पोषक तत्व आहेत, जे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी ब्लुबेरीचे सेवन केले जाते. एकरी घेता येते 60 लाखांचे उत्पादन, तर भारतात एप्रिल, मे महिन्यात ब्लूबेरीच्या रोपांची लागवड केली जाते. 10 महिन्यानंतर त्यांच्या रोपापासून फळ मिळणे सुरू होते.

Blueberry in Maharashtra
याचा अर्थ फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फळ तोडण्यासाठी सुरुवात होते. आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर ब्लूबेरीचे रोपांची छाटाई केली जाते. आणि त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये ब्लूबेरीला फांद्या फुटतात, फुलं लागणे सुरू होते.
दरवर्षी याची उत्पादन क्षमता वाढत जाते. एकरी 3000 प्लांट लावता येतात. एका झाडापासून दोन किलो ब्लूबेरी मिळते. तर वर्षाला 1000 रुपये प्रति किलोचा विचार केला तर 6000 किलो तर ब्लुबेरी विकून शेतकरी 60 लाख रुपये पर्यंत उत्पादन घेऊ शकतात. अशा प्रकारचे ही ब्लूबेरी शेती आहे. ब्लूबेरीची शेती अधिक माहिती करिता तुम्ही खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहू शकता.