Chamomile Farming Profit :- शेतकरी बंधूंनो आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने शेती करत असाल, तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. या लेखाच्या माध्यमातून अशा फुलांची लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत
ज्यातून नक्कीच इतर पिकांपेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. अर्थातच करोडपती होण्याचा हा सुपरहिट मार्गच आहे. तर कोणत्या जादुई फुलांची लागवड आहे या फुलाचं नाव आणि याची शेती कशी करतात किती उत्पादन मिळतं याची माहिती पाहणार आहोत. जादुई फुलांच्या लागवडी बद्दल माहिती पाहूयात.
Chamomile Farming Profit
उत्तर प्रदेश, हमीरपुर जिल्ह्यामधील बुंदेलखंडमधील मध्ये शेतकरी जादुई फुलाची (Chamomile Framing) लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पादन कमवत आहे. आणि यामुळे या शेतकऱ्याचा याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. आणि यातून चांगलं उत्पादन देखील त्या शेतकऱ्याला मिळत आहे.
या फुलांचे नाव काय आहे पुढे पाहूया. Chamomile Flowers म्हणून त्याला ओळखलं जातं. तर या फुलापासून आयुर्वेदिक, होमोपॅथिक, औषधे बनवली जातात. यामुळे खाजगी कंपनीमध्ये या फुलांना बंपर मागणी सुद्धा आहे. आता याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
Chamomile Tea
Chamomile जादूचे फुल निकोटीन मुक्त असल्यामुळे पोटाशी संबंधित आजारावर रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. या फुलाचे उपयोग सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील केला जातो. एवढंच नाहीतर या फुलांचा चहा (Chamomile Tea) सुद्धा असतो.
आयुर्वेद कंपनीत जादुई फुलाची मागणी जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुलांची लागवड सुरू केलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळत आहे. उत्पादन आणि कमाई यातून कशी होते ते शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी पाहूया.ओसाड जमिनीवरही जादुई फुलांचे बंपर उत्पादन यातून घेता येतं.

✅ हेही वाचा :- पडीक जमीनीतून या पिकांची शेती करून मिळवा, उसा पेक्षा दुप्पट उत्पादन, खर्च ही निम्याहून कमी मग वाट कसली बघता ? करा लागवड
कॅमोमाइल फुलांचे उत्पादन ?
या फुलांची लागवड करताना शेतकरी स्वतःचे आर्थिक आरोग्य देखील सुधारू शकतात. यात 1 एकर मध्ये 5 क्विंटल Chamomile फुले उत्पादन घेता येतं. या सोबतच एक हेक्टर मध्ये सुमारे 12 क्विंटल फुलांचा उत्पादन घेतलं जात. आता सुमारे याची किंमत 10 हजार ते 12 हजार रुपये एवढे आहे.
म्हणजे तुम्हाला खर्चाच्या 5 ते 6 पट नफा (Profit) यातून मिळू शकतो. हे पीक 6 महिन्यात तयार होतं, म्हणजे शेतकरी सहा महिन्यात लाखो रुपये कमवू शकतात. तर काही वर्षे या फुलांची लागवड केल्यास तुम्ही लवकरच करोडपती देखील होऊ शकतात.
अशा पद्धतीची ही शेती आहे, या फुलांची लागवड करून उत्तर प्रदेशमधील हमीरपुर बुंदेलखंड येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. या शेतीचे फायदे नेमकी काय आहे ? Chamomile फुले सुकल्यानंतर त्याचा चहा ही बनवून पिला जातो.

✅ हेही वाचा :- शेतीतून लाखों रु. कमवायचे ? मग ही शेती करा 10 लाखांचे उत्पन्न, जरबेरा शेती यशस्वी शेती !
कॅमोमाइल फुलांचे फायदे ?
या चहाने अल्सर आणि मधुमेहासारख्या आजारापासून मुक्त मिळते, असे अपडेट आहेत. याचवेळी Chamomile त्वचाच्या आजारांमध्ये देखील खूपच फायदेशीर आहे. आणि सोबतच तुमच्या शरीरात जळजळ निंद्रानाश अस्वस्थाता, चिडचिड यासाठी अत्यंत हे फायदेशीर आहे.
या फुलांचा उपयोग जखम, पुरळ, आणि पोटाच्या आजार बरे करण्यासाठी देखील केला जातो. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच याचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलची शेती करून जबरदस्त नफा घेऊ शकतात.

✅ हेही वाचा :- आता एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी ? पहा काय सांगतो कायदा ? वाचा कायदा रहा बिनदास्त !
