Chandrayaan 3 chi Mahiti in Marathi | चंद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठी | 15 दिवस उजेड, 15 दिवस अंधार… चंद्रयान-3चे लँडर जिथे उतरले चंद्रावरील ती जागा कशी आहे?; जाणून घ्या एका क्लिकवर

Chandrayaan 3 chi Mahiti in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज देशाचं आणि सर्व नागरिकांचे मान उंचावेल असं चंद्रयान 3 मिशन किंवा मुन मिशन हे यशस्वी झाले आहे. भारतातच चंद्रयान-3 हे चंद्रावर उतरला आहे. त्यामुळे भारताचे मिशन मुन यशस्वी झालाय. भारताचे चंद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे.

तिथे पंधरा दिवस उजेड असतो, आणि पंधरा दिवस अंधार असतो. याचविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी चंद्रयान तीन लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर भारताचे चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल असं देशातील 140 कोटी नागरिकांना विश्वास होता.

Chandrayaan 3 chi Mahiti in Marathi

या सोबतच भारत हा अंतराळातील महाशक्ती बनेल हा विश्वास ही होता. भारत इतिहास घडवू शकतो याचा विश्वास सर्व नागरिकांना होता. आणि 40 दिवसानंतर म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताची ही आकांक्षा पूर्ण झाली.

भारताने चंद्रावर पाऊल ठेवलं, आणि जगात एक इतिहास रचला, आणि चंद्रयान-3 ची सॉफ्ट लँडिंग झाली. त्यामुळे भारतीयांचं स्वप्न हे पूर्ण झालं. यामध्ये आता ही सर्व झाल्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आपलं चंद्रयान-3 हे लँडिंग किंवा जिथे उतरले तर त्या ठिकाणी पंधरा दिवस उजेड आणि पंधरा दिवस अंधार असतो.

चांद्रयान-३ ची वैशिष्ट्ये काय ? माहिती मराठी

  1. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
  2. चांद्रयान-2 च्या अपघातस्थळापासून ते सुमारे 100 किमी अंतरावर उतरवले जाईल.
  3. चांद्रयान-३ लँडरचे काम चंद्राचे तापमान, तेथील भूकंप, किरणोत्सर्ग, भूकंपाची क्रिया, प्लाझ्माची घनता आणि सौर वारे यांची माहिती घेणे असेल.
  4. चांद्रयान-3 हे अंतराळाच्या 100 किमी वर GSLV-MK3 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल.
  5. हे रॉकेट सुमारे 6 मजली उंच, 640 टन वजनाचे आहे.
  6. हे 37000 किमी उंच जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये 4000 किलो वजनाचा उपग्रह आपल्यासोबत घेऊन जाऊ शकते.
  7. रॉकेटसह चांद्रयान-3 मोहिमेचे एकूण वजन सुमारे 3900 किलो आहे.
  8. चांद्रयान-3 च्या लँडरचे वजन 1752 किलो आहे आणि रोव्हरचे वजन 26 किलो आहे.
Chandrayaan 3 chi Mahiti in Marathi

चंद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठी

या मागचे नेमके कारण काय आहे ? हे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दक्षिण ध्रुवावर अनेकांच्या नजरा आहे, यापूर्वी 2019 मध्ये इसरो ने चंद्रयान-2 ला चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण चंद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरू शकले नाही, तेव्हा हार्ड लँडिंग झाली होती.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केवळ भारतच नव्हे, तर चीन, अमेरिकेसहित जगातील अनेक देशाचा नजरा आहेत. चीनने काही वर्षांपूर्वी दक्षिण ध्रुवापासून काही अंतराळावर लॅन्डर उतरवलं होतं. एवढेच नाही तर अमेरिका पुढच्या वर्षी दक्षिण ध्रुवावर काही अंतराळात मानवांना पाठवण्याचे तयारी देखील करत आहेत.

आता नेमकी कसा दक्षिण ध्रुव ? हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. दर्शन पृथ्वीचा जसा दक्षिण ध्रुव आहे तसाच चंद्राचा आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुव अंटार्टिका मध्ये आहे. हा पृथ्वीवरील सर्वात थंड परिसर आहेत. तसाच चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे तोही तिथला सर्वात थंड प्रदेशाचा मानला जातो.

📑 हे पण वाचा :- वर्षभर आंबे देणारा या जातीच्या आंब्याची शेती कराल तर व्हाल करोडपती! देतो 12 महिने आंबे ! आताच जाणून घ्या !

‘चांद्रयान 3’ ची माहिती मराठी

नावचांद्रयान-3
लाँच तारीख(लाँच तारीख)14 जुलै 2023
लँडिंग तारीख23 ऑगस्ट 2023
मिशनप्रोपल्शन मॉड्यूल, लँडर, रोव्हर
ओपरेटरइस्रो
एक प्रोपल्शन मॉड्यूल वजन2,148 किग्रॅ
लँडरचे वजन1723.89 किग्रॅ
रोअरचे वजन26 किलो

चंद्रयान 3 संपूर्ण माहिती

यात सर्वात मुख्यतः जाणून घ्यायचे असल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुव कोणी अंतराळ मानव उभा राहिला तर त्याची सूर्याच्या क्षितिजाच्या नजर जाईल आणि तो चमकताना दिसेल. दक्षिण ध्रुवावरील अधिकाधिक भागावर अंधार असतो, कारण सूर्याची किरणे तिरपी आहेत.

त्यामुळे त्या भागात तापमान कमी असतं आणि सोबतच या भागात 15 दिवस 15 आणि 15 दिवस अंधार असतो. सातत्याने भागात अंधार असल्याने येथील तापमान कमी आहे, त्यामुळे या भागात पाणी आणि खनिज असू शकतात, असे आधीच्या मुन मिशनमुळे सिद्ध झाले आहे.

चंद्रयान 3 माहिती मराठी

ऑर्बिटरांमधील परीक्षणाच्या आधारे सर्व सांगितले होते, की चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आजूबाजूला बर्फ आणि दुसरे नैसर्गिक साधने असू शकतात असं नासाच म्हणणं आहे. मात्र यात अजून माहिती मिळवणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 1998 मध्ये नासाने मुन म्हणून मिशनने दक्षिण ध्रुवाच्या जवळ हायड्रोजन असल्याचे शोध लावला होता.

हायड्रोजन असणे हा तिथे बर्फ असण्याचा पुरावा असल्याचे नासाचा म्हणणं होतं. आणि नासाचे म्हणण्यानुसारच दक्षिण ध्रुवावरून मोठमोठे डोंगर आहेत, अनेक खड्डे आहेत. या भागात सूर्यप्रकाश फार कमी येतो, ज्या भागात सूर्यप्रकाश येतो तिथलं तापमान 54 डिग्री सेल्सिअस आहे.

चंद्रयान-3 लँडिंग जागा कशी माहिती मराठी

ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडत नाही तिथल्या 248 डिग्री सेल्सिअस इतकं आणि क्रेअटर्स हे काही अब्जावधी वर्षापासून अंधारातच आहे. येथे कधी सूर्यप्रकाश आलाच नाही मात्र याचा अर्थ असा नाही, दक्षिण ध्रुवाच्या अनेक भागात सूर्यप्रकाश असतो. शेकलटन क्रेटरच्या जवळ तर वर्षाचे 200 दिवस सूर्यप्रकाश असतो.

चंद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरला आहे, तिथे 15 दिवस सूर्यप्रकाश असेल, तर पंधरा दिवस अंधार असेल. 23 ऑगस्ट 2023 रोजी त्या ठिकाणी सूर्यप्रकाश होता त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी ते उतरवण्यात आलं होतं. मात्र पंधरा दिवसानंतर या परिसरात पुन्हा अंधार होणार आहे, अशाप्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !