Crop Insurance Complaint Online | पिकांचे नुकसान झाले ? पीक विमा हवा ? मग तात्काळ मोबाईल मधून करा पिकांची नुकसानभरपाई नोंदणी !

Crop Insurance Complaint Online :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि कामाचे बातमी आपण पाहणार आहोत. आता थेट घर बसल्या तुम्हाला पिकविण्यासाठी जी काही नुकसान भरपाई नोंदणी आहे ही करता येणार आहे. तर ही नोंदणी कशी करायची आहे ?याची सविस्तर माहिती आज जाणून घेऊया.

तुम्हाला माहितच आहे की पावसाचा खंड किंवा खंडानंतर अधिकच्या झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असेल. तर अशावेळी शेतकऱ्यांना घरबसल्या पीक विम्याची नुकसान भरपाईसाठी नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामानुसार एक केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते.

Crop Insurance Complaint Online

यासाठी अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, पीक काढण्याआधी किंवा नंतर पिकाच्या नुकसान अशा कारणांसाठी पात्र शेतकऱ्यांना भरपाई रुपये मिळते. तरी यामध्ये 21 दिवसाचा पावसाचा खंड झाला असेल, तर अग्रीमे रक्कम (विमा) देखील मिळतो.

पिकाची नुकसान झाली असेल तर शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून करता येते, यासाठी काय करायचे आहे ?याची स्टेप सविस्तर जाणून घेऊया.

क्रॉप इन्शुरन्स

नुकसानीची केंद्र सरकारने सुरु केलेल्या क्रॉप इन्शुरन्स नावाच्या आजच्या माध्यमातून हे प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे. त्यानंतर नुकसान भरपाई चा फॉर्म तुम्हाला भारायचा आहे. यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आणि विमा

कंपनी मार्फत शेतकऱ्यांना गूगल प्ले स्टोरवरून हा ॲप डाऊनलोड करण्याची आव्हान देखील केले जाते. आता नुकसान भरपाई नोंदणी फॉर्म कसा भरायचा आहे ? याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता.

✍️ हे पण वाचा :- सिबिल स्कोर | सिबिल स्कोर का आवश्यक आहे ? | सिबिल स्कोर म्हणजे काय असते ? | सिबिल स्कोर कसा चेक करायचा ?

क्रॉप इन्शुरन्स कसा भराल फॉर्म?

१. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील प्ले स्टोअरवर जाऊन Crop Insurance हा ॲप डाऊनलोड करा.

२. ॲप उघडल्यानंतर सुरूवातीला change the language हा पर्याय निवडून त्यावर तुमची मातृभाषा निवडा.

३. नोंदणी खात्याशिवाय म्हणजेच continue without login या पर्यायाची निवड करा.

४. त्यानंतर पीक नुकसान crop loss हा पर्याय निवडा

५.  त्यानंतर crop Loss intimation म्हणजेच पीक नुकसान नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नं टाका.

६. त्यानंतर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेल्या ओटीपीने मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा

७. यानंतर खरीप हंगाम/ रब्बी हंगाम निवडून नुकसान भरपाईचे वर्ष व राज्य निवडा. यानंतर हिरव्या रंगात दिलेल्या सिलेक्ट पर्यायावर क्लिक करा.

८. विमा जर बँकेत भरलेला असेल तर बँक निवडा, सीएससी केंद्रामध्ये ( Csc Center ) भरलेला असेल तर सीएससी निवडा किंवा तुम्ही स्वतः भरलेला असेल तर फार्मर ऑनलाईन ( Farmer Online) हा पर्याय निवडा.

९. जर तुमच्याकडे विमा पॉलिसीचा नंबर असेल तर तो टाका अन्यथा दुसरा पर्याय ।Select other option) निवडा.

१०. आता पॉलिसी क्रमांक मिळवण्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका, महसूल मंडळ, गाव, ग्रामपंचायत, पिकाचे नाव, गट क्रमांक व 8अ वरील खाते क्रमांक टाका व Done या बटणावर क्लिक करा.

११. आता यादीत दिसणाऱ्या अर्जातून ज्या पिकाचे नुकसान झाले असेल त्या पिकाची निवड करा.

१२. पिकांच्या नुकसानीची घटना नोंदविण्याकरिता घटनेचा प्रकार ( Type of Incidence ), दिनांक, सध्याची पिकाची स्थिती, नुकसान भरपाईची अंदाजे टक्केवारी, त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.

१३. काळजीपूर्वक सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ( Submit )ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून पीक नुकसानीच्या पूर्व सिचनेचा डॉकेट आयडी मिळवा. Docket ID तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरती sms द्वारे पाठवण्यात येईल.

पीक नुकसान भरपाईसाठी पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरपाईसाठी अर्ज करता येईल.

येथे क्लिक करून Crop Insurance App डाउनलोड करा