Damini Mobile App Download :- वीज पासून बचावासाठी वरदान ठरेल भारत सरकारचे दामिनी मोबाईल ऍप. विजेपासून बचावासाठी दामिनी मोबाईल ऍप हे शासनाने लॉन्च केलेला आहे. तुम्हाला माहितीच असेल
की विजेमुळे होणारे जीवितहानी हा चिंतेचा विषय आहे. या सर्वांचा विचार करता भारत सरकारने आता Damini Mobile App Download in Marathi हे लॉन्च केले आहे.
दामिनी मोबाईल ऍप
अर्थात भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी मोबाईल ऍप हे लॉन्च केले आहे. आणि तुम्ही ज्या लोकेशनवर राहता त्या ठिकाणी पुढच्या 15 मिनिटात वीज पडणार की नाही ते या ॲपच्या माध्यमातून समजते.
अर्थातच हे दामिनी मोबाईल ऍप त्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे दामिनी मोबाईल अँप तुम्हाला अलर्ट (सूचना) देत असते. भारततात वीज पडल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना आपले प्राण गमावे लागले.
Damini Mobile App Download
त्यामुळे विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय कडून दामिनी मोबाईल ऍप हे लॉन्च करण्यात आले आहे. ज्या भागात राहत असलेल्या
पुढच्या पंधरा मिनिटात वीज कुठे पडणार किंवा तुम्ही ज्या लोकेशनवर राहतात त्या ठिकाणी वीज पडणार की नाही ? हे दामिनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून समजते.

दामिनी मोबाईल ऍप माहिती
दामिनी मोबाईल ॲप हे पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अर्थातच आयआयटीएम ने भारत सरकारची पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणारी साहित्य संशोधन संस्था आहे.
या संस्थेने 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग ऍप’ केलेला आहे. संस्थेने वीज प्रवण क्षेत्र अचूक रित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत.
या नेटवर्क सेंट्रल प्रोसेसर हा आयआयटीएम संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्क कडून आलेले सिग्नल त्यावर प्रक्रिया देत असते. तर अशाप्रकारे आता हे दामिनी मोबाईल app संपूर्ण भारतामध्ये आहे.


📋 हेही वाचा :- तुम्हाला माहिती का ? महिलांसाठी पोस्टाची ही सुपर योजना ? थेट मिळतात 2 लाख रु. पहा अधिकृत माहिती, व घ्या लाभ !
Damini Mobile App
तिथे तुम्ही याचा लाभ मिळवू शकता, गुगल प्ले स्टोअरवरून दामिनी मोबाईल अँप हे तुम्हाला डाउनलोड किंवा इन्स्टॉल करता येते. आता गुगल प्ले स्टोअर वर हे Damini Mobile App in Marathi उपलब्ध
आहे. तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता, Damini Mobile App Install केल्यानंतर हे ॲप तुमचं लोकेशन मागेल लोकेशन परवानगी दिल्यानंतर तुमचे लोकेशन शोधेल.
तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल, आणि 15 मिनिटात वीज पडण्याची शक्यता आहे किंवा नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल.

दामिनी मोबाईल अँप सूचना कशी देते ?
तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिट पडण्याची शक्यता असते या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल. वीज पडणार नसेल तर नो लाइटिंग वॉर्निंग किंवा बिजली की चेतावणी नहीं अशी सूचना तुम्हाला दिली जाते.
वीज पडणार असेल तर त्या वर्तुळात लाल रंग दिसतो, असे दिसून आल्यास तुमच्या भागात पुढच्या 05 मिनिटात वीज पडण्याची शक्यता असल्याचं दिसते.
त्या वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. निळा रंग असेल 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.

📋 हेही वाचा :- बोनाफाईड Pdf डाउनलोड कसा करावा ? | बोनाफाईड प्रमाणपत्र मराठी Pdf डाउनलोड
Damini Mobile App Download
याची सूचना तुम्हाला दामिनी मोबाईल ऍपच्या माध्यमातून किंवा त्या वर्तुळात दिलेल्या रंगावरून समजते. अशाप्रकारे तुम्ही damini mobile ॲपच्या माध्यमातून भारत सरकारच्या दामिनी मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या भागात कधी वीज पडेल किंवा नाही याची माहिती तुम्हाला मिळत असते.
येथे क्लिक करून दामिनी मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा