Digital Driving Licence Download | आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस

Digital Driving Licence Download :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड हे कसे करायचे आहे ?. याबाबत संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याचे 3 सोप्या पद्धती आहेत. त्या कोणकोणत्या याचं संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. Digi Locker डायरेक्ट वेबसाईट आहे. वाहतूक सेवा डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे डाउनलोड करावे ते जाणून घेऊया.

Digital Driving Licence Download

ड्रायव्हिंग लायसन मिळाल्यानंतर लोकांना त्याची डिलिव्हरी मिळण्यासाठी सुमारे आठवडा वाट पहावी लागली. परंतु ड्रायव्हिंग लायसन थेट डाऊनलोड करता आले, तर किती चांगली ही गोष्ट आहे. ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी शासनाकडून आता हे पर्याय देण्यात

आलेले आहेत. स्वतःच्या मोबाईलवरून डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकतो. तुम्ही तुमचा डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स परवाना तुमच्या स्मार्टफोनमध्ये आत्ताच मोबाईल मध्ये सुरक्षित डिजिटल कॉपीच्या स्वरूपात संग्रहित करता येतो.

डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड हे कसे करायचे ?

डिजिलॉकर, आणि परिवहन सेवा वेबसाईट किंवा मोबाईल ॲप द्वारे डाउनलोड करू शकता, यासाठी सर्वात सोपी पद्धत पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनवर DigiLocker एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.

त्यानंतर मुख्य आवश्यक असलेली कागदपत्रे विभागातून ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय हा निवडावा लागेल. त्या ठिकाणी विविध पर्याय दिसतील, परंतु तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर लागेल. पर्यायच्या सूची मधून रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालय निवडाव लागेल.

Digital Driving Licence Download

DigiLocker एप्लीकेशन Play Store मधून डाउनलोड करा 

digilocker Driving Licence download

तुमचा ड्रायव्हरचा परवाना क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर कागदपत्रे प्राप्त करा. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी पीडीएफ डाउनलोड पर्याय असेल. तिथे तुम्ही आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरून तिथे तुम्ही डिजिटल लायसन्स हे काढू शकता.

डिजिटल पद्धत पर्याय क्रमांक :- 2 परिवहन सेवा या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावे लागेल. ऑनलाईन सेवा या विभागांतर्गत ड्रायव्हर परवानाशी संबंधित सेवावर क्लिक करा. वरील ड्रॉप डाऊन मेनू मध्ये राज्याची निवड ड्रायव्हिंग लायसन्स विभागात ड्रायव्हिंग लायसन्स प्रिंट करा.

क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख, समाविष्ट करून सबमिट बटणावर निवडल्यानंतर आणि तुमचे लायसन्स माहिती भरा. नंतर पाहिल्यानंतर तुमचा हा परवाना प्रिंट करू शकता, किंवा पीडीएफ मधून सेव करू शकता.

Digital Driving Licence Download

येथे क्लिक करून परिवहन वेबसाईट येथे पहा 

driving licence download pdf

Digi Locker वेबसाईटला भेट देऊन, तुमच्या खात्यात लॉगिन करा. त्यानंतर Home Page वरच्या डाव्या कोपऱ्यात सर्च डॉक्युमेंट दुवा निवडा. नंतर मेनू मधून ड्रायव्हरचा परवाना निवडा रस्ते वाहतूक महामार्ग मंडळ टॅप करा.

त्यानंतर तुमचा ड्रायव्हरचा परवाना क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Get the डॉक्युमेंट हा पर्याय निवडा. तुमचे डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स हे डाउनलोड होईल अशा प्रकारे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स हे Download करू शकता.

Digital Driving Licence Download

येथे क्लिक करून Digi Locker वेबसाईटला भेट द्या !


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान विहीर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !