Dragon Fruit Anudan Yojana | ड्रॅगन फ्रुट 1.60 लाख रु. अनुदान online अर्ज सुरु

Dragon Fruit Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विदेशी फ्रुट फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुटला महाराष्ट्र राज्य मध्ये परवानगी दिली आहे. आणि यासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट लागवड वर अनुदान दिले जाणार आहे.

तरी आज ड्रॅगन फ्रुट विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. जसे ड्रॅगन फ्रुटसाठी किती अनुदान दिले आहे. त्याचबरोबर किती हेक्टर पर्यंत आपल्याला मर्यादित देण्यात आलेले आहे अनुदान कसे दिले जाणार आहे. त्याची पात्रता निवड कागदपत्रे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dragon Fruit Yojana 2022 

ड्रॅगन फ्रुटला मराठीत (कमलम) हे नाव देण्यात आले आहे. ड्रॅगन फ्रुट याफळांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट मुळे फळाला सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त या फळांमध्ये फॉस्फरस कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. तसेच पाणीटंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात तसेच या पिकामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त खर्च येत नाही.

तसेच भारतामध्ये ड्रॅगन फ्रुटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी निर्णयक्षमता औषधे व पोषक मूल्ये इत्यादी बाबी लक्षात घेऊन. सण 2021-22 व्या वर्षापासून राज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अर्थातच अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान ऑनलाईन अर्ज 

ड्रॅगन फ्रुट ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यावयाचा आहे. अशा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अर्थातच एक शेतकरी अनेक योजना. या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करून योजनेचा लाभ घेऊ शकता. ड्रॅगन फ्रुट ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ आपण पाहू शकता.

ड्रॅगन फ्रुट योजना कागदपत्रे

  • स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सातबारा उतारा
  • 8 अ उतारा
  • आधार सलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रथम पानाची झेरॉक्स प्रत फोटो सहित
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती)
  • सामायिक सातबारा उतारा असल्यास इतर खातेदारांचे संमती पत्र

इत्यादी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड आपल्याला करावी लागणार आहे. परंतु आपली निवड झाल्यानंतर आपल्याला ही ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान निवड 

आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर याची सोडत कशी होणार याबद्दलची माहिती पाहूयात. महा- डीबीटी या ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ड्रॅगन फ्रुट लागवड या घटकाच्या आर्थिक लक्ष्यांक प्रमाणे ऑनलाइन सोडत आपली काढण्यात येणार आहे. अर्थातच ड्रॅगन फ्रुट लागवड घटक लक्ष्यांक आहेत या घटकांतर्गत कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या गावासाठी किती घटक हे उपलब्ध आहेत. आर्थिक लक्षांक किती आहेत. याचा विचार करून आपली ऑनलाइन सोडत काढण्यात येईल.

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना पात्रता

अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड पूर्णपणे (Dragon Fruit Anudan Yojana) नव्याने करावयाची आहे. तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. आपली निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यास मध्ये सर्वात प्रथम आपल्याला हमीपत्र अर्थातच संमती-पत्र देणे गरजेचे असणार आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान किती मिळेल

Dragon फळ पिकाच्या लागवडीसाठी प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरुप खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण, या बाबी करिता अनुदान देय आहे. याकरिता रक्कम 4 लाख रुपये प्रति हेक्‍टर प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 40 टक्के अनुदान या प्रमाणे. रक्कम रुपये एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच अडीच एकर जमिनीसाठी 1 लाख 60 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच हे अनुदान 3 टप्प्यात आपल्याला देण्यात येणार आहे. सर्वात प्रथम पहिल्या वर्षी 60 टक्के अशा प्रकारे आपल्याला 60:20:20 या प्रमाणात देय राहणार आहेत. दुसऱ्या वर्षी लागवडीचे 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणं अनिवार्य राहील.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment