Dragon Fruit Lagwad in Marathi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो आज लेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी कसे ड्रॅगन फ्रुट हे फळ लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमवू शकता. अशाच एका शेतकऱ्यांची यशोगाथा पाहुयात.
आणि त्यानंतर तुम्ही ड्रॅगन फ्रुट अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता व कागदपत्रे व याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचा व्हिडीओ पाहणार आहोत. जालना महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट मधून लखपती झाला आहेत. या ड्रॅगन फ्रुट शेती मधून 5 लाखांची कमाई केली आहेत.
Dragon Fruit Lagwad in Marathi
डिखुळे यांनी 2019 साली गावातील शेतकऱ्यांकडूनच रोपं खरेदी करत 1 एकरा मध्ये 7 बाय 12 अंतरावर रोपांची लागवड केली होती. पोल आणि ठिबक सिंचनासाठी 2.5 लाख तर रोपं खरेदी करण्याठी 50 हजार असा एकूण 3 लाखांचा खर्च त्यांना आला होता.
या लागवडीनंतर रोपांना फारशी किटकनाशक फवारावी लागली नाहीत. त्याचबरोबर खतांचाही मोठा खर्च लागत नाही. 18 महिन्यांनी पहिल्यांदा याचे 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा तिसऱ्या वर्षी मला 40 ते 45 क्विंटल उत्पादन निघाले आहेत.अशी माहिती डिखुळे यांनी दिली आहेत.

ड्रॅगन फ्रुट लागवड
अशाप्रकारे शेतकरी बंधूनो तुम्ही देखील ड्रॅगन फ्रुट मधून चांगली कमाई करू शकता. आणि हे वर्षानुवर्षी चालणारे पीक आहे. आणि याला चांगला भावसुद्धा मिळतो, 1 किलो साठी 150 ते 200 रुपये किलोयासाठी दर सध्या मिळतो. त्यामुळे तुम्ही या शेतीकडे नक्की पहा, आणि ड्रॅगन फ्रुट शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढावे.
या शेतीसाठीच शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय देखील मागील काळात घेतला गेलेला आहे. आणि या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांसाठी देखील अनुदान उपलब्ध होऊन शेतकरी या ड्रॅगन फ्रुट शेतीकडे नक्की वळावे. आणि आता ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना बद्दल बोलायचं झाल्यास शासनाकडून यासाठी अनुदान दिलं जातं.

📋 हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !
ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना
हे अनुदान कशाप्रकारे कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जात या योजनेसाठी फॉर्म कसे भरायचे आहेत. कागदपत्रे व इतर योजनेची सविस्तर डिटेल मध्ये माहिती तुम्हाला खालील दिलेल्या प्रमाणे आहेत. ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेअंतर्गत शासनाकडून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी किंवा लागवड साहित्य,
आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते, पीक संरक्षण, यासाठी अनुदान दिलं जाते. हे अनुदान कशाप्रकारे आणि कोणाला दिलं जात याची माहिती पाहूया. यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 4 लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40% प्रमाणे 1.60 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान 3 वर्षात जसे पहिल्या टप्प्यात 60% त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20% आणि तिसऱ्या टप्यात 20% या प्रमाणात देण्यात येणार आहे.

📋 हेही वाचा :- फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क !, तुम्ही तर ही चूक नाही ना केली ?
ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनासाठी फॉर्म कसा भरावा ?
दुसऱ्या वर्षी 75% आणि तिसऱ्या वर्षी 90% टक्के झाडे जिवंत असणं अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे कागदपत्रे किंवा जो योजनेचा लाभ आहे हा मिळणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
आता ड्रॅगन फ्रुट शेती यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो ? किंवा यासंबंधीतील तुम्हाला पीडीएफ हवी असल्यास खाली pdf दिला आहेत तो डाउनलोड करून पहा. ड्रॅगन फ्रुट संदर्भातील ज्या काही गाईडलाईन्स आहे, त्या गाईडलाईन सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत. तुम्ही याचे सविस्तर माहिती तिथे मिळू शकतात.

ड्रॅगन फ्रुट गाईडलाईन pdf व इतर सविस्तर माहिती येथे पहा