Duplicate Khat Kse Olkhayche :- आतापर्यंत अनेक माहिती आपणया वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. परंतु आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर शेतकरी बांधवांनो यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर
शेतकऱ्यांची फसवणूक होत असून याला आळा घालण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी कारवाई केली आहेत. आणि यासोबतच शेतकऱ्यांचे पण काम राहतं ते म्हणजे की शेतकऱ्यांनी घेतलेले खत हे बनावट (Duplicate) आहेत की खरे (Original) खत आहे हे ओळखायचे कसे याची माहिती थोडक्यातच जाणून घेणार आहोत.
Duplicate Khat Kse Olkhayche
बनावट खत कसे ओळखायचे याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहेत. बनावट खतं तपासण्यासाठी काही टिप्स ट्रिक्स तुमच्याकडे असं गरजेचं आहे. तर त्या ट्रिक्स काय आहेत त्या कशा प्रकारे वापराव्या ही माहिती पाहणार आहोत. खालील पद्धतीने ओळखा बनावट खते.
- बनावट डीपी खत ओळखायचे असल्यास, तुम्हाला डीपीच्या गोणीतील खत म्हणजेच डीएपी खताचे दाणे हातावर घ्या.
- त्यानंतर तंबाखू मध्ये चुना टाकतो त्याचप्रमाणे चुना डीएपी खतामध्ये टाका,
- त्याला चांगला घासून घ्यावे म्हणजेच मिक्स करून घ्या.
- त्यानंतर डीएपी खतातून उग्रवास येत असेल किंवा त्याचा वास घेणे खूप कठीण जात असेल तर हे खत खरे (Original) समजावे.
- तसेच DAP खात्याचे दाणे जर टणक, दाणेदार, आणि तपकिरी व काळ्या रंगाचे असले तर खत खरे आहेत.
- या खतांना नखाने तोडण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते दाणे सहज तुटत नाहीत.
- परंतु डीएपी खत जर बनावट तुमचे असेल, तर त्या ठिकाणी खताचे दाणे नखाने सहजपणे फुटतात.
- असे झाले तर डीएपी खते पूर्णपणे बनावट आहे असे समजावे.

📒 हे पण वाचा :- तुम्हाला हा कायदा माहिती का ? वडिलांच्या संपत्तीत मुलींना हिस्सा कधी मिळत नाही ? जाणून घ्या कायदा व फायद्यात रहा !
बी बियाणे, खते, खरेदीपूर्वी या गोष्टी चेक केल्या ?
जर तुम्ही आता या रासायनिक खते खरेदी करत असाल किंवा बियाणे खरेदी करीत असाल तर एकूण ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही खते किंवा बियाणे, कीटकनाशके खरेदी कराल तेव्हा नेहमी परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावे.
तसेच खते किंवा बियाणे कीटकनाशके खरेदी करत असताना पॅकिंग हे सीलबंद आहे का हे अवश्य चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणतीही पुढे चालून तुमच्या पिकांना त्याचा इफेक्ट बसणार नाही. आणि त्यात सर्वात महत्वाचं त्याची एक्सपायरी डेट म्हणजे औषधाची वापरण्याचा जो काही कालावधी आहे हा संपत असतो.
खाली दिलेला व्हिडीओ पहा समजून घ्या कोणते खत खोटे ? कि खरे ?
Banavat Khat Kse Olkhayche
त्यामुळे एक्सपायरी डेट चेक करून घ्यावी. ज्या दुकानात खते, बी बियाणे, कीटकनाशक खरेदी करणार आहात त्या दुकानातून पक्के बिल घेणे खूपच गरजेचे आहे. त्यानंतरच त्या बिलवर संबंधित दुकानाचा परवाना क्रमांक, तसेच
दुकानाचे पूर्ण नाव, पत्ता, विक्रेतेची सही, आणि त्यासोबत उत्पादनाचे नाव, उत्पादनाचा लॉट व बॅच नंबर, आणि तारीख हे देखील बिलामध्ये नमूद असणं गरजेचे आहे. तरच अशा दुकानदारांकडून खत घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही पुढे चालून प्रॉब्लेम येणार नाहीत.
📒 हे पण वाचा :- लव्हाळा तणनाशक | शेतातून मुळासकट लव्हाळा संपवा जाणून घ्या सविस्तर खरी माहिती व प्रक्रिया