E Pan Download E Filing | पॅन कार्ड हरवलं ? तत्काळ पॅन कार्ड हवंय ? मग मोफत या सरकारी वेबसाईटवर करा डाउनलोड !

E Pan Download E Filing :- नमस्कार सर्वांना, सध्याच्या काळात पॅन कार्ड असणं खूपच महत्वाचे झाले आहे. पॅन कार्ड असेल तर तुम्ही बँकेतून कॅश व्यवहार किंवा अन्य कोणत्याही व्यवहारासाठी पॅन कार्ड वापरू शकता.

पॅन कार्ड ही अतिशय महत्त्वाचं कागदपत्र बनला आहे. आणि अशा वेळेस तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा दंड किंवा तोटा हा असला लागू शकतो. पॅन कार्ड असेल तर तुमच्या अनेक जे की कामे आहेत हे सोपे होते.

E Pan Download E Filing

पॅन कार्ड असेल आणि ते पॅन कार्ड हरवले असेल. आणि तुम्हाला तत्काळ पॅन कार्ड हवं असेल तर तुम्हाला शासनाकडून एक सुविधा दिली जाते. म्हणजे ई-पॅन कार्ड असणे आवश्यक असते.

शासनाने ई-पॅन कार्ड ही सेवा सर्व नागरिकांसाठी सुरू केली आहे. आता ई-पॅन कार्ड कशा पद्धतीने मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येते. हे आपण आज जाणून घेऊया.

ई-पॅन कार्ड डाऊनलोड

प्रत्येक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक सध्या आहे, आता तुम्ही इतर सर्व सुविधांसाठी डिजिटल पॅन कार्ड वापरू शकता. आणि स्मार्ट फोन मध्ये ही डाउनलोड करू शकतात.

ते इन्कम टॅक्स यामध्ये 2 प्रकारे येतात UTIITSL आणि NSDL हे आहेत या वेबसाईटवरून पॅन कार्ड डाउनलोड केले जाते. इलेक्ट्रॉनिक वर्जन डाऊनलोड करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.

📑 हे पण वाचा :- लय भारी, एलआयसी ने सुरू केली ही भन्नाट पॉलिसी मुलांच्या भविष्यासाठी, या योजनेत 150 रु. गुंतवणूकीवर मिळवा 8,44,500 रु. मोठा परतावा !

ई-फायलिंग पॅन कार्ड डाऊनलोड

याची पद्धत तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. वेबसाईटवरून तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करता येते. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.

पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी ई-फायलिंगची अधिकृत वेबसाईट त्यावर ती जाऊन तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.

Download E-PAN Step in Marathi

स्टेप 1 :- सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2 :- त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-PAN वर क्लिक करा.
स्टेप 3 :- आता Check Status/ Download PAN च्या खाली दिलेल्या Continue वर क्लिक करा.
स्टेप 4 :- आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.
स्टेप 5 :- आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
स्टेप 6 :- आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.
स्टेप 7 :- यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN हे पर्याय उपलब्ध असतील. यामधून Download E-PAN चा पर्याय निवडा.
स्टेप 8 :- नंतर Save the PDF file वर क्लिक करा. यानंतर तुमचं ई-पॅन डाउनलोड होईल. 

Download Instant E-PAN

तुम्ही डाउनलोड केलेले ई-पॅन कार्ड पीडीएफ फाईल पासवर्ड प्रोटेक्ट असेल. त्याचा पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख म्हणजेच दिवस/ महिना / वर्ष

या फॉरमॅट मध्ये तुम्हाला टाकावे लागते. अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड तत्काळ डाऊनलोड करू शकता, अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *