E Peek Pahani App Download :- ई-पीक पाहणी करताना तुमच्याकडून चूक झाली, तर जो काही योजनांचा लाभ आहे याला मुकावे लागणार आहे. तुम्हाला न चुकता ई-पीक ओहनी पाहणी स्वतःच्या मोबाईलवरून बांधावरून कशी करायची आहे हीच माहिती जाणून घेणार आहोत.
जेणेकरून तुम्हाला ई-पीक पाहणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती या लेखात पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे. या अंतर्गत शेताच्या बांधावरून किंवा शेतातून स्वतः आपले पिकांची, किंवा पडीक जमिनीची किंवा बांधावरील झाडांची नोंद ही स्वतः मोबाईलवरून थेट सातबाऱ्यावर करू शकता.
E Peek Pahani App Download
यासाठी शासनाने ई पीक पाहणी हा उपक्रम सुरू केलेला आहे. या अंतर्गत खरीप हंगामातील पिकांची नोंदणी द्वारे तुम्हाला करता येते. आता यंदाच्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. आणि हंगामाच्या पिकांची नोंद करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून ई पीक पाहणी सुरू झालेली आहे.
महसूल विभागा अंतर्गत ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात सुरुवात करण्यात आली होती. दरवर्षी खरीप व रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची नोंदणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना करता येते.
ई पीक पाहणी करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते ? किंवा कशी पिकांची नोंद करावी लागते, जेणेकरून तुम्ही कोणती ही चुकीची पद्धतीने ई पीक पाहणी करू नये. आणि तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळावा, यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे.
ई पीक पाहणी कशी करावी ?
कोणत्याही योजनाचा लाभ मिळत नाही ? जसे ई-पीक पाहणी न केल्यास नवीन हंगामातील सातबारा उपलब्ध होत नाही. अर्थात जो काही सातबारावरील पीक पेरा आहे, जुनेच पीक तेच उपलब्ध राहील. रेकॉर्डवर शेती पडीकच दिसेल, आणि इत्यादी बाबी आहेत किंवा हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री करता येणार नाही.
पीक कर्ज शासनाकडून मिळणारी मदत व प्रोत्साहन तसेच जमीन कृषी व महसूल विषयक योजनांचा लाभ तुम्हाला मिळण्यास अडचणी येतात. यासाठी ई पीक पाहणी हे न चुकता करावी. किंवा ही ई पीक पाहणी योग्य रित्या व्हावी यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्यात.
✅ हेही वाचा :- तुम्हाला माहिती का ? ग्रामपंचायतचे सर्व दाखले/प्रमाणपत्र आता घरबसल्या मोबाईल वर काढता येतात,शासनाने केली नवीन सुविधा सुरू !
ई पीक पाहणी नोंदणी
आता ई- पिक पाहणी करण्यासाठी शासनाचं नवीन ॲप म्हणजेच नवीन व्हर्जन हे अपडेट केलेला आहे. आता मोबाईल वरून तुम्हाला अर्थात गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागते. यंदाच्या साली 2.0.11 हा नवीन व्हर्जन शासनाकडून अपडेट केलेला आहे. E Peek Pahani App Download Google Play Store वरून इन्स्टॉल करावी लागेल. किंवा मोबाईल मध्ये अगोदरच असेल तर त्याला अपडेट करावे लागेल. त्यानंतर ई-पिक पाहणी एप्लीकेशन कसं वापरायचा आहे ?.
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर यावरून तुम्हाला ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावी लागेल.
- त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल, आणि पुढे स्वतःचा जिल्हा, तालुका, गाव,
- आणि खातेदार निवडा योग्य गट क्रमांक टाका, ही माहिती भरून झाल्यानंतर आपला परिचय निवडा आणि त्यानंतर पुन्हा होऊन पेजवर या होम पेजवर यावे.
- आल्यानंतर पिकाची माहिती तुम्हाला भरावी लागते, यामध्ये पिकाची अचूक माहिती भरल्यानंतर खाते क्रमांक, तुम्हाला अचूक निवडावा लागेल.
- पुढे भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र निवडू लागेल.
- त्यात सुरू असलेला हंगाम निवडावा लागेल. त्यानंतर पिकाचा वर्ग एक पीक असेल
- (निर्भेळ पीक) पिके निवडा आणि एका पेक्षा जास्त पिके असेल तर बहुपिक तुम्हाला त्यात निवडावे.
ई पीक पाहणी online registration
आता हे सर्व पर्याय झाल्याच्या नंतर तुम्हाला पिकाचे नाव निवडावे लागेल, त्यानंतर सिंचन पद्धत कशी आहे ? विहिर, ठिबक, तुषार, जे काही तुमचं साधन असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी निवडावे लागेल. त्यानंतर पिकांचा लागवडीचा दिनांक त्याठिकाणी अचूकपणे भरल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया करायचे आहे.
ती म्हणजे स्वतःच्या मोबाईलचे जीपीएस अर्थातच लोकेशन चालू ठेवून शेतात उभे राहून मुख्य पिकाचे छायाचित्र तुम्हाला घ्यायचे आहे. आणि ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याने मुख्य पिकाचे छायाचित्र काढताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
हे व्यवस्थित अपलोड झाले आहे का ? किंवा व्यवस्थित फोटो काढून अपलोड झाला आहेत ? याची खास काळजी तुम्हाला घ्यावी लागते. तर आता यानंतर जर पाहिलं तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या शेतातून ई- पीक पाहणे सोपे पद्धतीने करू शकता.
✅ हेही वाचा :- आता एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी ? पहा काय सांगतो कायदा ? वाचा कायदा रहा बिनदास्त !
ई पीक पाहणी अँप डाउनलोड
आता ई पिक पाहणी खातेदारांची एकदाच नोंदणी होते. आणि 15 सप्टेंबर पर्यंत हंगामी या पिकाची माहिती अक्षांश-रेखांशसह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रसह अपलोड करण्यात यावी. त्यानंतर 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲप मधील माहिती अचूक पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती करून तलाठ्याद्वारे कायम केले जाते.
या संबंधित डिजिटल स्वाक्षरी सातबारा मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असते. अशा प्रकारे तुम्ही रब्बी हंगाम किंवा खरीप हंगामासाठी ई पीक पाहणे अँप द्वारे तुम्ही हे ई पाहणी शेताची करू शकतात. एकाच मोबाईल वरून 20 खातेदाराची नोंदणी करता येते.
अशा प्रकारे तुम्ही आता शेतातून ई पीक पाहणे करू शकता. आणि तुमचा जो काही पिकाचा पेरा आहे, हा सातबारा वरती चढू शकता. अशा पद्धतीचे एक महत्त्वाचा अपडेट आहे. आणि E Peek Pahani App Download लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करण्यासाठी किंवा इंस्टॉल करण्यासाठी अधिकृत गुगल प्ले स्टोअरची लिंक खाली दिलेली आहे.