E pik Pahani Kashi Karayachi :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखा मध्ये ई-पीक पाहणी या कार्यक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. ई-पीक पाहणी काय आहेत ?. हे ई-पीक पाहणी कशी करावी लागते.
या संदर्भातील शासन निर्णय त्याचबरोबर ई-पीक पाहणी केल्याचे फायदे, लाभ काय आहेत, हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ई-पीक पाहणी आपण करत असाल.
आपल्याला पिक विमा, नुकसान भरपाई मिळू शकते. कारण ई-पीक पाहणी केल्यानंतर आपल्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद ही झाली आहे. ही नोंद अंतिम धरण्यात येते त्यामुळे आपण ई-पीक पाहणी करून घ्यावी.
E pik Pahani Kashi Karayachi
शासन निर्णय क्र. महा.शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय. क्रमांक जमीन २०१८ प्र. क्र. ९२ / ज-१अ, दिनांक : ३०.७.२०२१ अण्वये ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट, २०२१.
पासून राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय स्तरावरून Real time crop data संकलित करणे. तसेच सदर data संकलित करताना पारदर्शकता आणणे.
पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर data वापरणे. हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट हे आहे.
ई-पीक पाहणी केल्याचे फायदे
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी. प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे. २. राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रं. निश्चित करण्यात येत आहे. E pik Pahani Kashi Karayachi
गाव/तालुका/जिल्हा / विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे. याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ३. कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना.

हेही वाचा; 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना सुरु पहा जीआर
ई-पिक पाहणी का करावी ?
जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादी चे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे. ४. आधार भूत किंमतीवर धान / कापूस / हरभरा व तूर खरेदी इत्यादी. योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
५. खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येते.
६. खातेदार निहाय पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज अथवा पीक विमा योजना भरणे. किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे. ७. कृषी गणना अंत्यत सुलभ पध्दतीने व अचूकरित्या पुर्ण करता येईल.

ई पीक पाहणी अँप डाउनलोड
ई-पीक पाहणी नोंदणी प्रकिया
नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर / वेब लिंक वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा. २. खातेदाराने ई पीक पाहणी अॅप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
३. ७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी .४. खातेदार त्यांचे नाव किंवा खाते क्रमांक शोधून नोंदणी करू शकतील.
पिक पाहणी वर पिकांची नोंद कशी करावी ?
५. ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत. त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास,त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
६. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारे चार अंकी संकेतांक (पासवर्ड) प्राप्त होईल. ७. सदरहू प्राप्त झालेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत अचूकपणे नोंदविल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
८. यशस्वी नोंदणी प्रक्रियेनंतर नोंदणीकृत मोबाईलवर खातेदाराचे नाव निवडून चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत टाकून लोगिन केल्यास पिक पाहणीची माहिती भरता येईल.
ई-पिक पाहणी महत्वाच्या सूचना
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :- शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांक. च्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२
किंवा ८ अ ची अद्ययावत प्रत सोबत असल्यास योग्य राहील.
सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गाव न.नं. ७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे. ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी. पिक विमा योजनेत विमा घेतलेले पिक. आणि ई-पिक पाहणी पाहणीमध्ये नोंदविलेलेपिक पाहणी यामध्ये तफावतीचा मुद्दा आढळून आल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

येथे पहा मोबाईल ने ई-पिक पाहणी कशी करावी व्हिडीओ
ई-पिक पाहणी मार्गदर्शक सूचना
३. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील. ४. खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची. असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो
(GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करावी. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल. त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल. E pik Pahani Kashi Karayachi
५. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
६. एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल. तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात. ७. एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.
📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा