E Pik Pahani Online Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा अपडेट आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत आपल्या शेतपिकांची नोंद सातबारे वर नोंदवता येते यासाठी शासनाची ई पीक पाहणी हा उपक्रम राज्यभर राबवलं जातो.
ई-पिक पाहणी हा कार्यक्रम खास शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे. शेतकऱ्यांची धावपळ किंवा शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये पिके आहेत किंवा बांधावरची झाडे आहेत. याची नोंद स्वतः सातबाऱ्यावर करता यावी यासाठी E Pik Pahani हा उपक्रम राबवला जात आहे.
E Pik Pahani Online Maharashtra
या माध्यमातून शेतकरी बांधव आपल्या शेतातूनच शेत पिके, फळझाडे, पडीत जमीन, विहिरीची नोंद, अन्य नोंद केल्यानंतर आपली E Pik Pahani यशस्वीरित्या सातबाऱ्यावर अपलोड झाली आहे का ? आणि
यशस्वी ही झाली आहे का ?, हे देखील पाहणं शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचे ठरतं कारण या पिकांची नोंद आपल्या सातबारे वर नसेल तर आपल्याला पिक विमा, नुकसान भरपाई, सरकारी कामे ही मदत मिळणार नाही, किंवा विमा मिळत नाही.
ई-पीक पाहणी वर्जन-2
अशा कारणांनी आता या ठिकाणी ई-पीक पाहणी वर्जन-2 अंतर्गत कशी करायची आहे. आणि त्याचबरोबर ई-पिक पाहणी आपण केली असेल तर ही पीक पाहणी आपली यशस्वी झाली आहे का ?, हे स्वतःच्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटात चेक करता येते.
सर्वप्रथम ई-पीक पाहणी हे Google play Store च्या माध्यमातून हे E Pik Pahani Version- 2 इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर त्याचं जे काही परमिशन आहे ही परमिशन देऊन आपल्याला सातबारा वर पिकांची नोंद करता येते.
ई-पीक पाहणी App येथे डाउनलोड करा
ई-पिक पाहणी कशी करावी व त्याचे फायदे
या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या काही अटी-शर्ती आहेत. E Pik Pahani प्रकल्पात सहभागी होत आहेत. आणि ही पीक पाहणी अंतर्गत शेतीपिकाची किंवा फळ झाडांची नोंद 7/12 ऱ्यावर करायची असेल,
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येते. ई पीक पाहणी नोंदणी करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम प्ले स्टोर मधून E-Pik Pahani वर्जन 2 ह्या इन्स्टॉल करावे लागेल. या इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला खाली देण्यात आलेल्या फोटोमध्ये या ॲपची माहिती आहे.
ई-पीक पाहणी वर्जन-2 द्वारे कशी ई-पिक पाहणी करावी ?
ॲप डाऊनलोड झाल्यावर तुमचा महसूल विभाग निवडावा लागेल. महसूल विभाग झाल्यानंतर, तुमचा मोबाईल नंबर तसेच तुमचा, विभाग, जिल्हा ,तालुका, गाव यांची निवड करावी लागेल. आणि त्यानंतर पुढील बटणावर क्लिक करून पुढील प्रक्रिया साठी माहिती भरता येते.
त्या पुढील प्रक्रियांमध्ये पहिले तुमचे नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, यापैकी माहिती भरून शोध बटणावर क्लिक करावे लागते. त्यानंतर तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे पर्याय यावरती क्लिक करायचे आहे.
ई-पिक पाहणी मध्ये फोटो का घ्यावा लागतो ?
तुम्ही सर्व माहिती फोटोच्या स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला पीक पेरणीची माहिती भरायची आहे, आता पिकांची निवड करायची आहे. जे की आपण पेरलेले असेल, तुम्हाला पिकांची सिंचन साधन प्रकार निवडायचा आहे.
विहीर असेल तलाव, असेल बोरवेल, असेल अशा प्रकार हा निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकांचा फोटो अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड करण्यासाठी पिकांचं अक्षांश, रेखांश सहित उभे पिकांचे छायाचित्र अपलोड करावे लागतील.
E Pik Pahani App Download
जे की आपण स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारे तुमची E Pik Pahani App अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. आणि आता ई-पीक पाहणी ही चेक कशी करायची ? जे की तुम्हाला यशस्वी झाली आहे की नाही हे कळेल.
त्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वर टच करून या संदर्भातील सविस्तर माहिती पाहता येणार आहे. किंवा ॲप त्या ठिकाणी वरून आपण E Pik Pahani App Download करू शकता.
येथे टच करून व्हिडीओ पहा व चेक करा KYC झाली का ?
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा अर्ज
📢 शेळी पालन 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर :- येथे पहा