E-Pik Pahani Status Online :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने ई-पीक पाहणी हा उपक्रम राबवण्यास 2021 पासून सुरु केलेली आहेत. आणि या योजनेअंतर्गत म्हणजेच या उपक्रमांतर्गत शेतकरी बांधव स्वतः
घरबसल्या म्हणजेच शेताच्या बांधावरून किंवा शेतातून थेट आपल्या पिकाचा पेरा सातबाऱ्यावर नोंदवू शकतो. म्हणजेच पिकाची नोंद सातबारा वर करू शकतो. यासाठी शासनाने उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ हा मोठा वाचत आहे.
E-Pik Pahani Status Online
यामध्ये आता शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून यशस्वीरित्या अपलोड झाली आहे का ?, किंवा कोणत्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ई-पीक पाहणी केली आहे. ती यशस्वी झाली आहे का ?, किंवा त्याचं क्षेत्र किती आहे ?, कोणते पीक त्यांनी लागवड केलेली आहे.
ही माहिती त्यात पाहता येते. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन अंतर्गत शासनाने ई-पिक पाहणी वर्जन-2 हे नवीन व्हर्जन प्ले स्टोअर ला अपडेट केलेले आहे. तिथून आपण ते इन्स्टॉल करून किंवा इंस्टॉल असेल तर अपडेट करून आपण ओपन करून आपला लॉगिन करायचा आहे.
ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन
लॉगिन केल्यानंतर आपल्याला गावाची यादी सगळ्यात शेवटी हा पर्याय दिसणार आहे. त्या पर्यावर टच केल्यानंतर आपल्या गावातील गट नंबर नुसार किंवा शेतकऱ्यांच्या नावानुसार अ पासून ते ज्ञ पर्यंत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
अशा शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्यासमोर आपल्याला दिसणार आहे. आपल्याला नावाव टच करून, गट नंबर, नाव इत्यादी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या नावासमोर हिरव्या रंगांमध्ये आपलं नाव असेल
E-pik Pahani Kashi Karavi ?
त्या ठिकाणी आपली केवायसी पूर्ण सक्सेस झालेले आहे, यशस्वीरित्या झाली आहे. असे समजावे अन्यथा आपली ई-पिक पाहणी झाली नाही किंवा त्यात काय अडचण आहे?. कोणते त्यात फोटो किंवा व्यवस्थित लोकेशन आलेले नसेल त्यामुळे ती यशस्वीरित्या झाली नसेल.
याची त्या ठिकाणी आपल्याला माहिती देखील पाहायला मिळू शकते. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने कोणत्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे, किंवा आपली यशस्वीरित्या झाली आहे का ?, हे पाहता येणार आहेत. एप्लीकेशन आणि त्यासंबंधीतील अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.
E-Pik Pahani Status Online
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा