Electric Tractor

Electric Tractor :- इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी एकूण 10 युनिट वीज वापरली जाते. आणि सरासरी कोणतेही भागात प्रति युनिट दर 8 जरी ठेवला तरी पूर्ण चार्जसाठी सुमारे 80 रुपये या ठिकाणी लागतात.

त्यामुळे 80 रुपयांमध्ये आपल्याला 6 तास ते आठ तास ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळतो. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर हा डॉक्टर 80 रुपये खर्च करून 6 तास चालेल. त्याचवेळी डिझेलची किंमत 90 110 रुपये प्रति लिटर आहे.

सुमारे 6 तास काम करण्यासाठी ट्रॅक्टर ला 6 लिटर इंधन लागेल. या ट्रॅक्टरसाठी तुम्हाला 500 ते 550 रुपये एवढा खर्च या ठिकाणी लागू शकतो. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तो विक्रीसाठी सध्या उपलब्ध नाही.

Electric Tractor

परंतु या ट्रॅक्टरची कंपनीने सांगितलं की त्याची किंमत सुमारे 5 लाख 50 हजार रुपये पासून सुरू होईल. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने कृषी वाहनावर सरकारने दिलेल्या सवलतीचा समावेश केल्यास त्याची किंमत आणखी देखील कमी होऊ शकते.

त्याचबरोबर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरीवर 3 वर्षे किंवा तीन हजार तासाची वारंटी दिली जाते. आणि इलेक्ट्रिक मोटरसाठी 2 हजार तासाची वॉरंटी दिली जाते. तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी सौर पॅनल जोडून देखील चार्ज करू शकता.

असा हा ट्रॅक्टर आहे, या संदर्भात अजून हा ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आलेला नाही. परंतु लवकरच ही कंपनी या ठिकाणी लॉन्च करणार आहे. गुजरात मधील शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. आपण ट्रॅक्टरचे फोटो देखील या ठिकाणी पाहू शकता.