Falbag Lagwad Anudan Yojana :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आता या बाबींसाठी 100% अनुदान मिळणार आहे. तर ही नेमकी योजना काय असणार आहे ? कशाप्रकारे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ?
नेमके काय म्हणाले आहेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू करण्यात असलेली स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Falbag Lagwad Anudan Yojana
यांतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन, यासारख्या कामांना 100% अनुदान मिळते. त्याचबरोबर योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. फळबाग लागवड अंतर्गत
ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान येते त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी दिली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर करण्यात असल्याचं अपडेट त्यांनी दिला आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे देखील धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. आवश्यकता भासल्यास 100 कोटीचे तरतुदीमध्ये
आणखी वाढ करण्यात येईल अशी देखील माहिती ट्विटर द्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आणि सोबतच राज्य सरकारने 06 जुलै 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यास मान्यता दिली आहेत. या अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश आहे.
📑 हे पण वाचा :- या फळांची लागवड करा व्हा करोडपती, 1000 प्रति किलोने विकले जाणारे फळ, एकरी 60 लाखांचे उत्पन, पहा खास फळाची शेती व हा व्हिडीओ !
फळबाग लागवड योजना
यामध्ये गड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 100% अनुदान हे देण्यात येत असते. हे तुम्हाला माहितीच असेल तर आता ठिबक सिंचन अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत
असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ठिबक सिंचन ऐवजी आता थेट सर्व प्रकारचे खतांसाठी 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे आता फळबागांकडे जास्त शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात वळावे अशी देखील कृषिमंत्री यांनी माहिती दिली आहे.
महाडीबीटी फार्मर ऑनलाईन अर्ज
नेमकी आता यासाठी 100% अनुदान आहे परंतु आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?. अर्ज महाडीबीटी फार्मर पोर्टल यावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज कसा करायचा आहे ? याची सविस्तर माहितीच लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्हाला फळबाग लागवडीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि भरा ऑनलाईन फॉर्म पहा व्हिडीओ.