Falbag Lagwad Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजना | फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म | फळबाग लागवड अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Falbag Lagwad Anudan Yojana :– नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 100% टक्के अनुदानावर मसाले पिके, फुल पिके, सुगंधी पिके, इत्यादी.

योजना या योजनेअंतर्गत राबवली जाते, लागवडीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. व एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना या योजनेअंतर्गत विविध फळपिके, विविध सुगंधी पिके, विविध फुलपिके, मसाले पिके यासाठी 100% टक्के अनुदान दिलं जातं.

या बाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, कोणत्या पिका साठी किती अनुदान आहे, ऑनलाईन अर्ज कसा करावा. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, पात्रता काय, संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा.

Falbag Lagwad Anudan Yojana

एकात्मिक विकास फलोत्पादन अभियान योजना सुरू सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील दिलेल्या फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जात. त्यामध्ये आवळा फळबाग लागवड, सिताफळ लागवड योजना ,अंजीर फळबाग लागवड योजना,

पेरू फळबाग लागवड योजना, फणस फळबाग लागवड योजना. जांभुल फळबाग लागवड योजना, आंबा लागवड योजना, संत्री अनुदान योजना, डाळिंब अनुदान योजना, चिकू अनुदान योजना, मोसंबी

फळबाग लागवड अनुदान योजना. चिंच फळबाग लागवड योजना, ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, फॅशन फ्रुट फळबाग लागवड योजना.टेंभुर्णी अनुदान योजना, ब्ल्यूबेरी अनुदान योजना.

या बाबीसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अर्ज केला जातो. या संदर्भातील अर्ज कसा करायचा आहे, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा. तसेच पुढे दिलेल्या व्हिडिओ पण नक्की पहा.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना :- सदर योजने अंतर्गत फळपिके अंतर्गत लाभार्थ्यांना आवळा, काजू, नारळ, सीताफळ, अंजीर. पेरू, फणस, जांभूळ, कागदी लिंबू, कोकम, आंबा, संत्री, डाळिंब, मोसंबी, चिंच या योजनेचा फळबाग लागवडीसाठी लाभ दिला जातो.

सदरील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करायच  पुढे दिलेला व्हिडीओ आपण नक्की पाहू शकता. सुगंधी पिके लागवड यामध्ये सिट्रोनेला, जिरेनियम, गवती चहा ई. फुल पिके मध्ये विविध प्रकारचे देशी-विदेशी फुलपिके यासाठी अनुदान दिलं जातं.

याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ आपण नक्की पाहू शकता. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मार्गदर्शक सूचना तसेच कोणत्या बाबीसाठी किती अनुदान दिले जाते.

कागदपत्रे पात्रता अनुदान याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल आपण डाऊनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. ➡ पीडीएफ येथे पहा 

Falbag Lagwad Yojana

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच लाभार्थ्यांसाठी जे शेतकरी फळबाग लागवड करू इच्छीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 10 हेक्टर पर्यंत 100 टक्के अनुदानावर

फळबाग लागवड, तसेच फुल झाडे, लागवड असतील मसाले पिके. असतील इत्यादी बाबींसाठी देखील 100 टक्के अनुदानावर लाभ आपल्याला देण्यात येतो. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीवरती क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.

👉👉येथे पहा संपूर्ण माहिती👈👈 

Mahadbt Farmer Scheme

सदर योजना अंतर्गत कृषी यांत्रिकरण अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पावर टिलर अवजारे यंत्रे व अवजारे इत्यादी या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

कृषी यांत्रिकीकरण मध्ये कोणत्या योजनासाठी किती अनुदान आहे कोणत्या योजना राबवल्या जातात.संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता.

👉👉येथे पहा संपूर्ण माहिती👈👈 

फळबाग लागवड अनुदान योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु झाले आहे, सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान हे दिलं जातं. तर या योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे म्हणजेच कोणते शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात पात्र आहेत

त्याचबरोबर अनुदान कसे दिलं जातं आपल्या मध्ये कोण कोणते झाड म्हणजे स्वरूप आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो शंभर टक्के अनुदानाचा पण फायदा घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती खाली दिली आहे आपण ती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर जाऊन पाहू शकता.

👉👉फळबाग लागवड 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा👈👈 

फळबाग योजनांची लाभ व अटी ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लाभार्थ्यांना १००% टक्के अनुदान देण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के याच्यात 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे

तीन वर्षे देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांची जीविताचे प्रमाण बागेतील झाडांच्या 90 टक्के तर करोडो झाडांसाठी 80 टक्के ठेवण्यास आवश्यक आहे.

हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाला याचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी दहा गुंठे तर जास्तीत जास्त दहा हेक्टर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र

लाभार्थ्यांना प्रथमता योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे तर उर्वरित क्षेत्रासाठी वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून लाभार्थी या योजनेत लाभ घेऊ शकतात. अल्प अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकर्‍यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

फळबाग लागवड योजनेच्या पात्रता

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य
  • सर्व प्रवर्ग अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल (कुटुंबाची व्याख्या पती-पत्नी व अज्ञात मुले)
  • वैयक्तिक शेतकऱ्यांना देय अनुदान आहे.
  • संस्थात्मक लाभार्थ्यांना दिली नाही
  • शेतकऱ्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे
  • संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकरी स्वतःच्या हिश्याच्या मर्यादित लाभ घेता येईल.
  • सातबारावर कुळाचे नाव नसल्यास कुळांची संमती आवश्यक
  • परंपरगत वननिवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील भागानुसार च्या क्षेत्रामध्ये त्यात शेतकर्‍यांना लाभ घेता येईल
फळबाग योजनेस आवश्यक कागदपत्रे
  • सातबारा व आठ अ उतारा
  • हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची संमती पत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

फळबाग लागवड योजनाचे अनुदान 

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३ टप्यात अनुदान दिले जाते पहिल्या टप्यात 50% टक्के अनुदान दुसऱ्या टप्यात ३०% टक्के अनुदान व तिसऱ्या टप्यात २०% असे एकूण अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.

Falbag Yojana Online Application

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Online अर्ज कसा करावा व कागदपत्रे वर अर्ज नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती साठी आपल्याला खाली दिलेला हा video संपूर्ण पाहायचा आहे या मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

कोणत्या फळबाग कलमांना किती बाय किती असाव कोणत्या फळबाग हेक्टरी किती कलम (रोपे) मिळणार पाहण्यासाठी खाली संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना कागदपत्रे

  • स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सातबारा उतारा
  • 8 अ उतारा
  • आधार सलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रथम पानाची झेरॉक्स प्रत फोटो सहित
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती)
  • सामायिक सातबारा उतारा असल्यास इतर खातेदारांचे संमती पत्र

इत्यादी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड आपल्याला करावी लागणार आहे. परंतु आपली निवड झाल्यानंतर आपल्याला ही ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान निवड 

आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर याची सोडत कशी होणार याबद्दलची माहिती पाहूयात. महा- डीबीटी या ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ड्रॅगन फ्रुट लागवड या घटकाच्या आर्थिक लक्ष्यांक प्रमाणे ऑनलाइन सोडत आपली काढण्यात येणार आहे.

अर्थातच ड्रॅगन फ्रुट लागवड घटक लक्ष्यांक आहेत या घटकांतर्गत कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या गावासाठी किती घटक हे उपलब्ध आहेत. आर्थिक लक्षांक किती आहेत. याचा विचार करून आपली ऑनलाइन सोडत काढण्यात येईल.

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना पात्रता

अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड पूर्णपणे नव्याने करावयाची आहे. तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. आपली निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यास मध्ये सर्वात प्रथम आपल्याला हमीपत्र अर्थातच संमती-पत्र देणे गरजेचे असणार आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान किती मिळेल

Dragon फळ पिकाच्या लागवडीसाठी प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरुप खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण, या बाबी करिता अनुदान देय आहे.

याकरिता रक्कम 4 लाख रुपये प्रति हेक्‍टर प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 40 टक्के अनुदान या प्रमाणे. रक्कम रुपये एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच अडीच एकर जमिनीसाठी 1 लाख 60 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

तसेच हे अनुदान 3 टप्प्यात आपल्याला देण्यात येणार आहे. सर्वात प्रथम पहिल्या वर्षी 60 टक्के अशा प्रकारे आपल्याला 60:20:20 या प्रमाणात देय राहणार आहेत. दुसऱ्या वर्षी लागवडीचे 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणं अनिवार्य राहील. 

Leave a Comment