Farmer Producer Company 2022 | शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा व अनेक योजनेचा लाभ घ्या

Farmer Producer Company 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेती माणुसकी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत मिळणारे विविध फायदे व योजनेचा लाभ कसा घेऊ शकता. यामध्ये कोणत्या योजना राबवल्या जातात कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याच बरोबर शेतकरी उत्पादक कंपनी चे फायदे काय काय आहेत. ती संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर लेखा संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Farmer Producer Company 2022

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ? :- शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते.

उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे. ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात. आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतक-यांचे गट, समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात.

तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे, नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे, नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे.

500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी किमान आवश्यकता

  • किमान १० शेतकरी सभासद
  • १० सदस्यांमधील किमान ५ संचालक असणे आवश्यक.
  •  प्रत्येक सदस्याचा ७/१२ उतारा व शेतकरी असल्याच्या दाखला आवश्यक
  • आधारकार्ड ,मतदानकार्ड,दोन फोटो,
  • प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तऐवज आणि इतर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक.

वरील माहिती नुसार आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबर वर आपण थेट कॉल करून या योजनेच्या अर्ज पासून ते अर्ज मंजुरी पर्यंत सर्व प्रक्रिया आपण यांच्याकडून जाणून घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा

Chetan Bhutada
Mob: 8855098984

शेतकरी उत्पादक कंपन्यांना फायदे & योजना कोणत्या ?

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. सन २०१९-२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता.

नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्धता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान. नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलोपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध.

कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी. सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात. समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाणार.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु मिळणार 25 लाख रु. अनुदान येथे पहा GR 

राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्या साठी सुरु करण्यात येणार. इक्विटी ग्रॅन्ट योजना: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.

क्रेडिट ग्यारंटी फंड: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याज दाराने दिले जाते.

शेतकरी उत्पादक कंपनी योजना

अवजारे बँका: महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिले जातात.

स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्रा. अग्रिब्युजिन्स अँड रूरल ट्रान्सफॉर्मशन (स्मार्ट) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार.

या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रोजेक्ट दिले जाणार. बिनव्याजी बिनातरण प्रकल्प कर्ज: शेतकरी उत्पादक कंपन्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे १० लाख रुपये बिनातरण बिनव्याजी प्रकल्प कर्ज दिले जाणार.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबींचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते. कंपनीने आजपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना विविध योजना व शासकीय अनुदान घेण्यास मदत करते.

हेही वाचा; 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु येथे माहिती 

 Farmer Producer Company / व्यवसाय करता येतील ?

पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, मिल्क प्रोजेक्ट, फिश फार्मिंग, मशरूम प्रोजेक्ट, अंडी प्रोडक्शन. FMCG प्रोडक्ट प्रोडक्शन. आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट. बायोफ्युल डेवलपमेंट प्लांट.

ऑरगॅनिक फार्मिंग, कोल्ड स्टोररेज, किसान सेवा केंद्र, महिला व पुरुष गटांना प्रशिक्षण देणे. पापड उद्योग, फुलाची शेती, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, करार पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना पिकासाठी मोफत मार्गदर्शन करणे.

शेतकऱ्यांना क्रेडीटवर रोपे अवजारे बी-बियाणे, खत-बियाणे देणे, प्रक्रिया उद्योग व विक्री, आठवडी बाजार, जलयुक्त शिवार अभियान, समृद्ध शेतकरी अभियान,  वृक्षरोपण अभियान इत्यादी. वर्षभर हमीभाव माल खरेदी- विक्री करणे. वखार पावती योजना.

Farmer Producer Company 2022

शेती विषयक माहिती व योजना येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !