Farmer Producer Company :- नमस्कार सर्वांना या लेखांमध्ये एक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी कशी करावी. व त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोणत्या योजनेचा लाभ दिला जातो. या योजना नेमकी काय आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू केल्यानंतर त्यापासून बेनिफिट काय होते. सुरू कशी करावे लागते. त्या संदर्भातील कागदपत्रे व इतर संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Farmer Producer Company
शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ? :- शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे. ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतक-यांचे गट. समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात. तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे. नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे, नवीन बाजारपेठ निर्माण करणे.
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी
तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे, विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे. तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाय-प्रोडक्ट बनविणे, कंपनी मार्फत खरेदी-विक्री केंद्र उभारणे.
मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किव्हा मालाची श्रेणी ठरवणे, मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे. कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला माल कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे. सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे.
उत्पादक कंपनी नोंदणीसाठी पात्रता
- किमान १० शेतकरी सभासद
- १० सदस्यांमधील किमान ५ संचालक असणे आवश्यक.
- प्रत्येक सदस्याचा ७/१२ उतारा व शेतकरी असल्याच्या दाखला आवश्यक
- आधारकार्ड ,मतदानकार्ड,दोन फोटो, पॅन काड
- प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तऐवज आणि इतर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजना कोणत्या ?
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. सन २०१९-२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता. नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्धता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान.
नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलोपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध. कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत. कमी सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात. समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाणार.
शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
Shetkari Utpadak Company
राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्या साठी सुरु करण्यात येणार. इक्विटी ग्रॅन्ट योजना: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते. क्रेडिट ग्यारंटी फंड: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना. त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याज दाराने दिले जाते.
अवजारे बँका: महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना. विविध प्रकारची अवजारे आणि यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिले जातात. स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये. स्टेट ऑफ महाराष्ट्राज अग्रिब्युजिन्स अँड रूरल ट्रान्सफॉर्मशन (स्मार्ट) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार.
📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म
📢 शेतकरी अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा