Farmer Success Story in Marathi | कोण म्हणतंय शेती परडवत नाही ? केवळ साडेतीन लाखात 15 लाखांचे कमाई, ही शेती करून तुम्ही ही कमवा लाखों रुपये कसे ते वाचा !

Farmer Success Story in Marathi :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण बातमी जाणून घेऊया. शेती करत असताना शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावं यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत आहे. आणि प्रयोगातून मोठ्या प्रमाणात उत्पादन कमवत आहे.

असेच एक यशोगाथा सरला ताई यांची आहे. त्यांनी साडेतीन लाख रुपये खर्चून ड्रॅगन फ्रुटची लागवड करून त्यातून 15 लाखाची उत्पन्न त्यांनी त्यातून मिळवलेला आहे. तर कशा पद्धतीने यांनी ही शेती केली आहे ? याची माहिती आपण जाणून घेऊया. वर्षोनुवर्षे कांदा, टोमॅटो, लागवडीतून कर्जाच्या खाईत जात होतो.

Farmer Success Story in Marathi

मार्ग सुचत नव्हता, आणि त्याचवेळी काहीतरी वेगळे करायचे मनात धरले होते. आणि असाच एक दिवस दूरचित्रवाहिनीवर ड्रॅगन फ्रुटची शेती बाबत माहिती पाहायला मिळाली. त्यानंतर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली, आणि नशीब फडफडले तर ही गोड बातमी येवला तालुक्यातील रायते येथील सरला चव्हाण यांची आहे.

चार वर्षंपूर्वी दूरचित्रवाणी वाहिनीवर ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती दिली जात होती, त्यावेळी सरला ताई यांनी ती माहिती ऐकली आणि त्याचवेळी ड्रॅगन फूड लागवड करण्याची किंवा शेती करण्याची त्यांनी निर्णय घेतला. चव्हाण कुटुंब गेली 25 30 वर्षापासून कांदा, टोमॅटो, आणि मक्का, सोयाबीन ही पारंपरिक पीक घेत होते. मात्र काही पदरी पडतच नव्हतं.

ड्रॅगन फ्रुट लागवड यशोगाथा

त्यामुळे ड्रॅगन फ्रुट हा जादुई फळांनी नशीबच पालटून दिले. चव्हाण दाम्पत्याने प्रथम 2 एकर वर कर्ज काढून ड्रॅगन फ्रुटची शेती केली. आता 4चार एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. सोबत कुटुंब कर्जमुक्त झाले असून यावर्षी रोपवाटिका देखील तयार केलेली आहे.

इतर राज्याच्या तुलनेत अर्ध्या किमतीत रूपे उपलब्ध करून या ठिकाणी देत आहे. त्यातूनही लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. ड्रॅगन फूड ला हेल्दी फळ म्हणून मार्केटमध्ये खूपच मागणी आहे. आणि सुरुवातीला खर्च येतो, मात्र नंतर अत्यल्प खर्चात मोठी उत्पादन मिळते. यावेळी सरला ताई मार्गदर्शन मोफत करत आहेत.

जसे रोज किमान 25 ते 30 शेतकरी माहिती घेण्यासाठी येतात. अशी माहिती सरला चव्हाण शेतकरी- रायते तालुका येवला यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही आगळे वेगळे प्रयोग करून शेतीतून देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन कमवू शकतात. अशी महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, ही माहिती तुमच्या कामात पडेल धन्यवाद…

📝 हे पण वाचा :- कास्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *