Farmers to get 12 digit identity card | शेतकऱ्यांना 12 अंकी ओळखपत्र मिळणार
नमस्कार मित्रांनो, भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या कृषी अर्थातच शेती संबंधित
आहेत, त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असते शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी
युनिक आयडी देण्यात येणार आहे. माध्यमातून केंद्र सरकारने विविध योजनेच्या सहजपणे लाभ घेता यावा यासाठी केंद्र
सरकारने एक महत्त्वाचा डेटाबेस तयार करत आहे, तर शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्राचे
विविध प्रयत्न सुरू आहे त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना योजना महत्त्वाकांक्षीठरत आहे. केंद्र सरकारच्या वतीने
सांगण्यात आला आहे.
काय आहे 12 अंकी युनीक आयडी
(What is farmer card?) देशातील सर्व शेतकऱ्यांना 12 अंकी युनीक ओळखपत्र अर्थातच (12 फार्मर युनिक आयडी) शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र सरकार नवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकल्पावर काम करत आहे पारांभिक माहितीनुसार शेतकऱ्यांना 12 अंकी युनिक आयडी जारी करण्यात येणार आहे, शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे, 12 अंकी युनिक आयडी चा शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा लाभ जास्तीतजास्त मिळवण्यासाठी तसेच लाभ घेण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
12 अंकी युनीक आयडीचा फायदा
(Farmers to Get 12) केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 12 अंकी युनिक आयडी फक्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या युनिक आयडीचा फक्त शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे, ज्यांचे नाव सरकारच्या डेटाबेसमध्ये सामाविष्ट असेल त्या शेतकऱ्यांना अनेक योजना अर्थात केंद्र सरकार राज्य सरकार योजना व पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळणार आहे, तसेच अनेक योजनेचा लाभ अपात्र शेतकरी घेत आहेत किंवा लोकं घेता आहेत अशापासून या 12 अंकी युनिक आयडी मुळे अशा घटनांवर आळा देखील बसणार आहे, त्याचबरोबर शेतकरी शेतीमध्ये कोणते तंत्रज्ञान कोणत्या प्रकारची बियाणी वापरत आहे याची माहिती देखील सरकारकडे असणार आहे असल्याचं सूत्रांनी या वेळेस सांगितले आहे.
सर्व शेतकऱ्यांना 12 अंकी युनिक आयडी
(How do I get a Kisan identity card?) भारतीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत सरकार सध्या एक पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यावर काम करत असल्याचा माहिती येत आहे तरी यामध्ये ५.५. कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे, देशभरातील इतर शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रक्रियेवर काम सुरू आहे त्याचबरोबर देशातील सर्व शेतकरी बांधवांना हा युनिक आयडी तसेच जो सरकारचा डेटाबेस आहे यामध्ये सामाविष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती देखील सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.