FCI Recruitment 2022 | FCI Recruitment | नोकरी: 5043 जागांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज..

FCI Recruitment 2022 :- तरुणांसाठी खुशखबर! भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India) भरती सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, पगार, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे करायचा.

FCI Recruitment 2022

तसेच अर्जाच्या संबंधित ‌लिंक या लेखात मिळून जाईल. भारतीय खाद्य निगममध्ये होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. (Food Corporation of India Recruitment 2022)

 • पदाचे नाव आणि जागा
 • सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade-III)
 • कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
 • टंकलेखक आणि लघुलेखक ग्रेड 2 (Steno Grade 2)
 • एकूण जागा – 5043 जागा

भारतीय खाद्य निगम शैक्षणिक पात्रता

AG-III (तांत्रिक) – उमेदवार कृषी/ वनस्पतिशास्त्र/ जीवशास्त्र/ बायोटेक/ फूड इ. मध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणं गरजेचं आहे.

1 AG-III (खाते) – बी.कॉम मध्ये पदवी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. AG-III (डेपो) – अर्जदाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक तसेच पदवीधर असावा. JE (EME) – अर्जदाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.

Food Corporation Recruitment 2022

JE (Civil) – अर्जदाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असायला हवा. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी) – उमेदवार पदवीधर असावा. आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असायला हवा.

तसेच भाषांतराचा एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेनो ग्रेड-II – DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर असावा. तसेच यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे. (FCI Notification 2022)

FCI Notification Recruitment 2022

पगाराविषयी माहीती आणि अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा 👉 https://fci.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन FCI Category 3 Recruitment 2022 Notification PDF वर क्लिक करा.

 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2022 या तारखेपासून सुरू झाली आहे. (FCI Bharti 2022)
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://fci.gov.in/
 • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 https://fci.gov.in/
FCI Post 2022
 • सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade-III) – 28,200 रुपयांपासून ते 79,200 रुपयांपर्यंत पगार 
 • कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – 34,000 रुपयांपासून ते 1,03,400 रुपयांपर्यंत पगार
 • टंकलेखक आणि लघुलेखक ग्रेड 2 (Steno Grade 2) – 30,500 रुपयांपासून ते 88,100 रुपयांपर्यंत पगार
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
 • बायोडाटा (Resume)
 • दहावी, बारावी आणि पदवीचं शैक्षणिक प्रमाणपत्र
 • ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • पासपोर्ट फोटो (FCI Recruitment Apply Online)

भारतीय खाद्य निगम मध्ये भरती होत असल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे. या भरतीची सविस्तर माहिती या जाणून घेतली आहे. परंतु, ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. नंतर ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ही जॉब अपडेट इतरांना नक्की शेअर करा.


📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतजमीन खरेदी 100%अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !