Ferfar Download Online Maharashtra : नमस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये जुने,नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा हे
सर्व मोबाईलवर, डिजिटल सहीमध्ये online काढू शकता. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल सिग्नेचर मध्ये जुने नवीन फेरफार सात बारा 8 अ उतारा प्रॉपर्टी कार्ड. शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिले आहे.
त्यावरती कोणाचीही सही शिक्क्याची आवश्यकता नाही. कारण डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे त्यावर कोणाची सही शिक्क्याची आवश्यकता नसते. जुने फेरफार जुने नवीन सातबारा
जुने नवीन 8 उतारा व प्रॉपर्टी कार्ड हे मोबाईल मधून. कसे डाऊनलोड करता येईल. यासाठी नोंदणी कशी करायची आहे. सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
Ferfar Download Online Maharashtra
प्रति फेरफार तसेच सातबारा, 8 अ उतारा, प्रॉपर्टी कार्डसाठी किती रुपये. आपल्याला फी भरावी लागते संपूर्ण माहिती लेखामध्ये पाहणार आहोत.
जुने नवीन फेरफार कसे काढावे

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर यायचा आहे. या वर आल्यानंतर डावीकडे खाली न्यू यूजर रजिस्ट्रेशन अर्थातच नवीन नोंदणी यावर ती क्लिक करायचे आहे.
आपल्याला नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. नवीन नोंदणी कशी करायची त्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पहा. नोंदणीसाठी आपला वैयक्तिक माहिती.
जसे मोबाईल नंबर, नाव, आडनाव, त्याच बरोबर डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती आपल्याला टाकायची. त्यानंतर आपला राहण्याचा पत्ता आहे तो संपूर्ण टाकायचा.
त्यानंतर आपल्याला नोंदणी करता यूजर आयडी क्रिएट करायचा आहे. त्यानंतर आपण होम पेजवर आल्यानंतर आपल्याला डावीकडे login साठी पर्याय दिसतील.
त्यामध्ये लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाकून खाली Captcha दिलेला असतो. तो कॅप्टचा टाकून login या बटनावर क्लिक करायचं आहे.

डिजिटल फेरफार व सातबारा
तर त्यासाठी आपण https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/ या संकेतस्थळावर ओपन करा. लोगिन केल्यानंतर आपल्यासमोर डिजिटल सातबारा, डिजिटल 8 अ उतारा, व डिजिटल फेरफार, डिजिटल प्रॉपर्ट कार्ड. अकाउंट पेमेंट हिस्टरी, पेमेंट स्टेटस, हे पर्याय दिसतील.
यामध्ये आपल्याला जे आवश्यक असेल त्यावर ती सिलेक्ट करून आपल्याला जिल्हा निवडायचं. त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर सर्वे गट नंबर पुन्हा व्हेरिफायसाठी सर्व गट नंबर टाकून आपल्याला डाऊनलोड करायचं आहे.
डाऊनलोड करण्यासाठी फी किती ?
डाऊनलोड करण्यासाठी प्रति 15 रुपये चार्ज आपल्याकडून हे आकारले जातात त्यासाठी आपल्याला या पोर्टल वरती रिचार्ज करणं आवश्यक आहे पोर्टलवर आल्यानंतर रिचार्ज अकाउंट ऑप्शन दिसेल यावरती आल्यानंतर आपल्याला 1000 रुपये पर्यंत आपण या मध्ये ऍड करू शकता
जुने नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा
डाऊनलोड करण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/ या संकेतस्थळ वर आल्यानंतर नोंदणी करून जुने नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा आपण मोबाईल वरून PDF मध्ये डाऊनलोड करू शकता.
