Free Silai Machine Yojana | फ्री शिलाई मशीन योजनेची पात्रता ते अर्ज पर्यंत माहिती

Free Silai Machine Yojana :- तुम्हालाही घरी बसून शिवणकाम करून उत्पन्न मिळवायचे असेल, तर ही योजना तुमच्या कामाची आहे. पंतप्रधान मोदींनी ‘फ्री शिलाई मशीन योजना 2022’ सुरु केली होती. महिलांना रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

Free Silai Machine Yojana

मोफत शिलाई मशीन योजना, ज्या अंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेत सहभागी होऊन शिलाई मशीन मोफत मिळवू शकता.

मात्र, त्याआधी पात्रता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणे गरजेचे आहे. चला तर मग या योजनेबद्दल सर्व तपशील जाणून घ्या.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्या स्वतःची कामे करू शकतील म्हणूनच त्यांना शिलाई मशीन मोफत सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे.

कोणती कागदपत्रे लागतात ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय २० ते ४० वयोगटातील असणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

या मोफत शिलाई मशीन योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जन्मतारीख प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, तुम्ही अपंग किंवा विधवा असाल तर संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.

हेही वाचा: वैयक्तिक घरघुती शौचालय करिता ऑनलाईन अर्ज सुरु येथे करा अर्ज व मिळवा 12 हजार रु. अनुदान 

मोफत शिलाई मशीन योजना पात्रता

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यापूर्वी तुम्हाला त्याची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे वय २० ते ४० वर्षे आहे, कामगार महिलांच्या पतीचे उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. आणि आर्थिक दुर्बल महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा; शौचालय करिता अर्ज केला मग चेक करा यादीत आपलं नाव मिळतील 12 हजार रु. 

फ्री शिलाई मशीन योजना कुठे सुरु आहे ? 

या योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील ५० हजारांहून अधिक महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देणार आहे. ही योजना हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये सुरू होणार असून.

या अंतर्गत महिलांना रोजगार मिळणार. शिलाई मशीन मोफत मिळण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागतो. या योजनेद्वारे श्रमिक महिला मोफत शिलाई मशीन मिळाल्यानंतर स्वत:चा उदर्निवाह करता येणार.

Free Silai Machine Yojana

हेही वाचा; पोकरा योजनांची यादी आली पहा लगेच 

शिलाई मशीन योजना अर्ज करण्याची पद्धत

तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जावे लागेल. येथे तुम्हाला मोफत शिवणयंत्राचा अर्ज डाउनलोड करून भरावा लागेल. भरलेल्या फॉर्म सोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि तुमचा फोटो टाकून संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे. यानंतर तुमची पडताळणी केली जाईल. आणि पात्र आढळल्यास तुम्हाला शिलाई मशीन दिले जाईल. 👉 सकाळ वेबसाईट माहिती 


📢 नवीन सिंचन विहिरी करिता या शेतकऱ्यांना 3 लाख रु. करा ऑनलाईन अर्ज लगेच :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment