Free Uniform Scheme Maharashtra :- :- एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. आता या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश, बूट, पायमोजे इत्यादी बाबी देण्यात येणार आहे. या संबंधित शासन निर्णय शासनाने 06 जुलै 2023 रोजी निर्मित केलेला आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजना मधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इ. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.
Free Uniform Scheme Maharashtra
सध्यास्थिती उपरोक्त शाळा मधील फक्त दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. सदर विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच मोफत गणवेश योजना अंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट, व दोन जोडी
पाय मोजे यांचा लाभ देण्यासाठी शासन विचारधारणेत होते. आणि यासंबंधीतील शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. आता शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विचारतील सर्व मुली आणि
अनुसूचित जाती व जमातीचे, सर्व मुले आणि दारिद्य्ररेषेखालील पालकांची सर्व मुले याच्याबरोबरच योजने पासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांकरिता दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याचा मान्यता देण्यात आली आहे.

✅ येथे क्लिक करून शासन निर्णय pdf डाउनलोड करा
मोफत गणवेश योजना महाराष्ट्र
तसेच मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पाय मोजे यांच्या लाभ शालेय व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात यावा असे या ठिकाणी शासन निर्णय आहे.
एक जोड बूट, व दोन जोडी पायमोजे या योजनेच्या अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून करावयाचे. असल्याचे बाब तातडीने लक्ष देऊन मोफत गणवेश पासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याकरिता प्रति विद्यार्थी 600 रुपये प्रमाणे सन 2024 एकूण 75.60 कोटी रुपये.
सर्व पात्र विद्यार्थ्यांना 1 जोडी बूट, व 2 जोडी पाय मोजे उपलब्ध करून विद्यार्थी 170 प्रमाणे एकूण 25 सर्वसाधारण राज्य रकमेतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत शासन निर्णय आहे, या शासन निर्णय जी लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तिथून हा जीआर डाउनलोड करू शकता.

✅ हेही वाचा :- पोस्टाच्या या योजनेत करा FD, फक्त व्याजातून महिन्याचा खर्च भागेल, दरमहा मिळेल एवढे रुपये ? पहा पटापट !
मोफत गणवेश वाटप योजनांचा लाभ कोणाला मिळतो ?
मोफत गणवेश योजना मधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इ. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो
मोफत गणवेश वाटप योजना काय लाभ मिळतो ?
सर्व पात्र विद्यार्थ्यांना 1 जोडी बूट, व 2 जोडी पाय मोजे