Gai/Mhais Gotha Anudan Yojana |100% गाय/म्हैस गोठा अनुदान लवकर फॉर्म भरा

Gai/Mhais Gotha Anudan Yojana |100% गाय/म्हैस गोठा अनुदान लवकर फॉर्म भरा

नमस्कार सर्वाना, आजच्या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत गाय/म्हैस गोठा अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती व गाय/म्हैस गोठा अनुदान योजना मध्ये कोणाला अर्ज करता येणार आहे व त्यासाठी पात्रता काय आहे, गोठ्याचा लाभ कसा घेता येईल व त्यासाठीचा अर्ज (फॉर्म) कुठे मिळेल व कुठे जमा करायचा हि संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत, व गोठ्यासाठी 100% अनुदान दिले जाणार आहे व त्याविषयी संपूर्ण माहिती आपण खाली दिली आहे. 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय

दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.७ तरतुदींनुसार, ६ गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची

लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असावी. गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके

बांधण्यात यावे. जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात यावी. सदर कामाचा लाभ

मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र

असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन (रोहयो)

विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत

रु.७७,१८८/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना 

अकुशल खर्च = रु.६,१८८/- (प्रमाण ८ टक्के) कुशल खर्च रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के) = एकूण रु.७७,१८८/- (प्रमाण १०० टक्के) तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक/जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे. (Gai/Mhais Gotha Anudan Yojana) उपरोक्त शासन परिपत्रकातील ६ गुरांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते ६ गुरे करिता एक गोठा व त्यानंतरच्या अधीकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील मात्र ३ पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

गाय/म्हैस अनुदान योजना फॉर्म डाउनलोड 

गाय म्हैस गोठा अनुदान योजनेचा फॉर्म व योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून जाऊन आपण (डाउनलोड येथे करा) शकता त्याचबरोबर योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपल्याजवळील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर त्या साठी लागणारे कागदपत्रे व अन्य संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ आपण पाहू शकता व्हिडिओची लिंक (येथे पहा)


📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना :- येथे पहा 

Leave a Comment