Gerbera Farm in Maharashtra :- शेतकऱ्यांनो तुम्ही शेती करत असताना अजूनही जुन्या पद्धतीने शेती करून राबराब कष्ट करत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहेत का ? तुम्ही कमी कष्टांमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करून तुम्ही जुन्या शेतीच्या उत्पन्नाच्या तुलनेत चार ते पाच पटीने उत्पन्न काढू शकतात.
अशाच एका शेतीविषयी किंवा एक पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे पिकाच्या माध्यमातून तुम्हाला चांगली जोरदार कमाई करता येते. तर फुलेगाव 1 रुपयांपासून ते 3 रुपये दर मिळतो. तर सण, समारंभ,वाढदिवस, लग्न इ. काळात 10 रुपयांपर्यंत दर मिळतो. तर दोन्ही पॉलिहाऊस मधून वर्षाला साधारणपणे 10 लाख रुपये पर्यंत उत्पादन काढू शकतो.
Gerbera Farm in Maharashtra
पुणे जिल्ह्यामधील आर्वी गावातील केशव निवृत्ती सणस या शेतकऱ्यांनी आर्वी गावांमध्ये दोन ठिकाणी प्रतिकी दीड एकर अशी एकूण तीन एकर शेती केलेली आहे. आणि याच मध्ये यांनी टप्प्याटप्प्याने 10-10 गुंठे क्षेत्र दोन पॉलिहाऊस उभारणी केलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर यांनी जरबेरा फुलांची लागवड केलेली आहे.
यापासूनच योग्य व्यवस्थापनातून प्रतिदिन साधारण दोन हजार फुलांचे उत्पादन त्यांना मिळत आहे. आता यातून किती उत्पन्न होते यासाठी तुम्हाला पॉलिहाऊस चा विस्तार कसा करायचा ? योग्य व्यवस्थापन दिल्यास, काही महत्त्वाच्या बाबी आहे. उत्पादन आणि विक्री आणि याचे नियोजन कसे करायचे आहेत ? उत्पादनात येणारा खर्च त्याचबरोबर याला किती रु. भाव मिळतो ?. याची सविस्तर माहिती जे आहेत तुमच्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत.
यासाठी जरबेरा लागवड नियोजन कसे करायचे आहे ? (Gerbera Farming) तर पाहूया पॉलिहाऊस उभारण्यासाठी दर्जेदार लाल मातीची आवश्यकता पडत असते. आणि त्यांना आवश्यकता होती ती उपलब्ध करण्यासाठी भोर परिसरातून त्यांनी चौदाशे रुपये प्रत्येक ब्रास ने 130 ब्रास माती खरेदी केलेली आहे.
जरबेरा लागवड
आणि शेण खत 33 ब्रास शेणखतही त्यांनी खरेदी करून लाल मातीमध्ये शेणखत आणि खतांच्या भेसळ डोस मिसळून घेतला. त्यानंतर त्यांनी पॉलीहाऊस मध्ये रोपांची लागवडीसाठी गादीवाफे तयार केले. आणि त्यावर ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरून घेतलेल्या आहेत.
आणि त्यानंतर लागवडीसाठी खाजगी रोपवाटिकेमधून रोपाची मागणी करून त्यानुसार लागवडीवेळी योग्य वाढ झालेली आणि निरोगी रोपांची खरेदी केली. त्यानंतर सुरुवातीला चारशे रुपयांची लागवड करून त्यांनी टप्प्याटप्प्याने रुपये आणले आहे. तर त्यानंतर सध्या दोन्हीही पॉलिहाऊस मिळून साधारण 1 हजार रोपांची लागवड केलेली आहे.

📋 हेही वाचा :- तुम्हाला शेती परवडत नाही का ? मग या पिकांची शेती करेल मालामाल, हे तेल प्रति लिटर 20,000 रुपये भाव, वाचा डिटेल्स !
पॉलिहाऊस विस्तार कसा केला ?
सुरुवातीला 10 गुंठे क्षेत्रावर पहिल्या पॉलिहाऊस मधून मिळणारे उत्पादन पाहून त्यांचा आत्मविश्वासा मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतरच Gerbera Farm in Maharashtra पॉलिहाऊस मध्ये वाढ केली. त्यांनी ठरवले होते 2017-18 मध्ये 10 गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारणी केलेली आहे.
आणि त्यानंतर जर पाहिलं एकदा लागवड केल्यानंतर सरासरी 05 वर्षे पर्यंत फुलांचे उत्पादन त्यांना मिळत असल्याचे फुल उत्पादक सांगतात. मात्र योग्य व्यवस्थापनातून 7 वर्षांपर्यंत चांगले उत्पादन मिळत असल्याचे केशवराव सांगतात. अशाप्रकारे सध्या दररोज ते प्रतिदिन 2000 फुलाचे उत्पादन घेत आहे.

संपूर्ण जरबेरा व्यवस्थापन कसे करावे ?
आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी 0:52:34, 12:61:0 आणि 0:0:52 या विद्राव्य खतांचा मात्रा ठिबक द्वारे त्यांनी दिलेले आहेत. आता याचा जर आपण विचार केला तर दर बुधवारी फुलांचा दंडका वाढण्यासाठी ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रोजनची मात्रा देखील दिली जाते.
कीड-रोगांचा पादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी देखील केली जाते. तर ह्या सोबतच झाडांच्या पोषणासाठी दिवसाआड वाढ संजीवकांचा वापर केला जातो. आणि त्यानंतर पॉलिहाऊस मध्ये
तापमान नियंत्रणासाठी (नियंत्रित) ठेवण्यासाठी फॉगर्स शॉवर द्वारे पाण्याची फवारणी देखील त्यातून केली जात आहे. Gerbera Farm in Maharashtra उन्हाळ्यात दर सहा दिवसांनी तर हिवाळ्यात चार दिवसांनी पाण्याचा फवारणी केली जाते. या पॉलिहाऊस मधील तापमान नियंत्रण राहत असते.

📋 हेही वाचा :- शंखी गोगलगाय नियंत्रण नियोजन कसे करावे ?| शंखी गोगलगायी नियोजन व नियंत्रण कशा प्रकारे करावे ? जाणून घ्या कामची माहिती
Gerbera Farming, Cultivation, Rate ?
Gerbera विक्री याचे नियोजन कसे करायचे ? कसे नियोजन होतं काय भाव मिळतो ?पाहूयात. या ठिकाणी फुलाचे उत्पादन वर्षभर सुरू असते. तर एका पॉलिहाऊस मधून दररोज 1 हजार ते 1300 फुलांची उत्पादन मिळते. याची काढणी सकाळी लवकरच करावी लागते.
काढणी झाल्यानंतर पांढरा, पिवळा, लाल अशा विविध रंगाच्या फुलांची जोड्या त्यात बांधल्या जातात. तर फुलांच्या जोड्या योग्य पॅकिंग करून पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठवले जातात. आणि त्यानंतर फुलाच्या दरात कमी जास्त होत राहतात. परंतु सन समारंभाच्या काळात मागणी वाढल्याने चांगले दर मिळतात.
साधारणपणे प्रतिफुल 1 रुपयापासून ते 3 रुपयांपर्यंत भाव पर्यंत मिळतो. लग्न समारंभ किंवा सन असते, तर दहा रुपये पर्यंत त्याचा दर या ठिकाणी मिळत असतो. पॉलिहाऊस मधून वर्षाला साधारणपणे 10 लाख रुपये उत्पादन मिळते. अशा प्रकारे तुम्ही चांगलं उत्पादन या शेतीतून घेऊ शकता. नक्कीच ही शेती खूपच फायद्याची आहे.

📋 हेही वाचा :- आता एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी ? पहा काय सांगतो कायदा ? वाचा कायदा रहा बिनदास्त !